IPL 2021 Player Auction : 292 खेळाडूंवर लागणार बोली; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  सर्वाधिक 13 खेळाडूंची खरेदी करु शकते. सनरायझर्स हैदराबादला केवळ तीन खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करुन घेता येईल.

IPL 2021 Auction: आयपीएल 2021 (IPL 2021 Auction) मिनी लिलावात बोली लागणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयने जाहीर केली आहे. 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणाऱ्या मिनी लिलावात 292 खेळाडूंवर बोली लागणार आहे. अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि मध्यफळीतील फलंदाज केदार जाधव यांच्याशिवाय आस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावाचाही यादीत समावेश आहे. हे चारही खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी इतकी आहे. आयपीएल संचालन परिषदेनं खेळाडूंच्या संख्येत कपात केल्यामुळे केवळ 292 खेळाडूंवर बोली लागणार आहे. 61 जा रिक्त असून यात कोण-कोणत्या खेळाडूला फ्रेंचायझी भाव देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  सर्वाधिक 13 खेळाडूंची खरेदी करु शकते. सनरायझर्स हैदराबादला केवळ तीन खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करुन घेता येईल. किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या पॉकेटमध्ये  53 कोटी 10 लाख एवढी मोठी राशी असून संघ बांधणीसाठी त्यांना मोठी बोली लावून चांगला खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्याची संधी आहेय  हैदराबादकडे  10 कोटी 75 लाख एवढी रक्कम असून चेन्नई सुपरकिंग्सकडे  22 कोटी 70 लाख इतकी रक्कम आहे. त्यांच्याकडे 7 जागा उपलब्ध आहेत. चेन्नईने हरभजन आणि केदार जाधव यांना रिलीज केले होते.  

पाहा लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंची नावे आणि त्यांची मुळ किंमत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा आणि डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुन (Arjun Tendulkar) ही या यादीत आहे. त्याची मूळ किंमत 20 लाख इतकी आहे. मॅक्सवेल आणि स्मिथ यांच्याशिवाय शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड या परदेशी खेळाडूंची मूळ किंमत अधिक आहे. 1.5 कोटीच्या घरात तब्बल 12 खेळाडू आहेत.  भारतीय वेळेनुसार मिनी लिलावाची प्रक्रिया ही दुपारी 3 वाजल्यापासून सुरु होणार आहे. 

कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती रुपये?

चेन्नई सुपरकिंग्ज
पर्स: 22.9 कोटी रुपये
शिल्लक जागा : 7 (1 परदेशी खेळाडू)

दिल्ली कॅपिटल्स
पर्स: 12.9 कोटी रुपये
शिल्लक जागा : 6 (2 परदेशी खेळाडू)

कोलकाता नाईट रायडर्स
पर्स: 10.75 कोटी रुपये
शिल्लक जागा : 8 (2 परदेशी खेळाडू)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 
पर्स: 35.90 कोटी रुपये
शिल्लक जागा : 13 (4 परदेशी खेळाडू)

राजस्थान रॉयल्स
पर्स: 34.85 कोटी रुपये
शिल्लक जागा : 8 (3 परदेशी खेळाडू)

मुंबई इंडियन्स 
पर्स: 15.35 कोटी रुपये
शिल्लक जागा : 7 (4 परदेशी खेळाडू)

किंग्ज इलेव्हन पंजाब
पर्स: 53.20 कोडी
शिल्लक जागा: 9 (5 परदेशी खेळाडू)


​ ​

संबंधित बातम्या