विजय आवश्यकच होता - रोहित शर्मा

सुनंदन लेले
Saturday, 1 May 2021

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळताना बऱ्याच गोष्टी योग्य केल्या. गेल्या काही सामन्यात पराभव पत्करल्यावर चांगल्या विजयाची गरज होती. तो मिळाल्याने समाधान वाटत आहे, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळताना बऱ्याच गोष्टी योग्य केल्या. गेल्या काही सामन्यात पराभव पत्करल्यावर चांगल्या विजयाची गरज होती. तो मिळाल्याने समाधान वाटत आहे, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

चेन्नईहून दिल्लीला खेळायला जात असताना सगळे खेळाडू आनंदात होते. कारण चेपॉकच्या तुलनेत कोटलाची विकेट चांगली असते, हे सगळ्यांना माहीत होते. कोटलाच्या सीमारेषेजवळ असल्याने मोठी धावसंख्या उभारायला किंवा पाठलाग करायला दडपण येत नाही, हे सत्य असले, तरी आमच्या गोलंदाजांनी केलेली अप्रतिम कामगिरी मला विसरता येणार नाही, असे रोहितने सांगितले.

राजस्थानची सुरुवात चांगली झाली असताना आमच्या गोलंदाजांनी शेवटच्या सात षटकात केलेला मारा संघाला सामन्यात परत आणणारा होता. आमच्या गोलंदाजांनी धीर गमावला नाही. फक्त १ विकेट गमावली असताना त्यांचा धावफलक मजबूत होता. नंतर फलंदाजी करताना क्विंटन डिकॉकने समंजस फलंदाजी करून हातातले काम पूर्ण केले, असे मत मुंबई कर्णधाराने व्यक्त केले.

अजून काय हवे : पृथ्वी शॉ
धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरल्यावर फलंदाजीला उभा राहिलो, तेव्हा मी कोणतीही गोष्ट ठरवून करायची नाही, हे जाणले होते. शिवम मावी मला कुठे मारा करेल, याचा थोडा अंदाज होता. खराब चेंडू किंवा माझ्या पट्ट्यात आलेल्या चेंडूवर फटका मारायचा, इतकेच मला माहीत होते. चार सलग चौकार मारल्यावर मला वाटले होते, की मावी मला आखूड टप्प्याचा चेंडू टाकेल; पण त्याने तसे केले नाही जे माझ्या पथ्यावर पडले, असे दिल्लीकडून धडाकेबाज खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉने सांगितले.

मैदानाची एका बाजूची सीमारेषा जवळ असल्याने त्या बाजूला मारण्याचा माझा थोडा प्रयत्न होता. माझी फलंदाजीची शैली काही प्रमाणात वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखी आहे, असे म्हणतात. मला त्यांची फलंदाजी आवडायची. संधी मिळाली, तर मला त्यांच्याशी बोलायला आवडेल.  मला क्रिकेटमध्ये चढ-उतार येतात, याची कल्पना आहे. ऑस्ट्रेलियात मनासारखा खेळ झाला नाही आणि मला संघातून बाहेर जावे लागले. मी स्वत:वर खूप नाराज होतो. चांगली संधी गमावली म्हणून. त्या काळात माझ्या वडिलांनी मला धीर दिला, असे पृथ्वी म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या