IPL 2021 : जडेजासमोर सॅम कुरेनची तलवारबाजी; VIDEO का होतोय व्हायरल?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 10 April 2021

प्रॅक्टिस सेशनमधील सरावानंतर मैदानात ते कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात आयपीएल स्पर्धेतील दुसरा सामना रंगणार आहे. मागील हंगामातील निराशजनक कामगिरीत सुधारणा करण्याच्या इराद्याने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरेल. दुसरीकडे युएईतील आयपीएल स्पर्धेत फायनल गाठलेला संघ पुन्हा एकदा लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरशिवाय मैदानात उतरणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत रिषभ पंत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 

मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर नव्या जोमाने मैदानात उतरण्यासाठी सीएसकेच्या खेळाडूंनी चांगलीच मेहनत घेतली आहे. प्रॅक्टिस सेशनमधील सरावानंतर मैदानात ते कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दिल्ली विरुद्दच्या सामन्यापूर्वी  चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) ने  सोशल मीडियावरुन शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  

शास्त्री गुरुजी म्हणाले; धोनी vs पंत सामना पाहण्यापेक्षा ऐकायला मजा येईल

या व्हिडिओमध्ये  सॅम कुरेन (Sam Curran) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) एकत्र बॅटिंग करताना पाहायला मिळते.  जडेजाने एक उत्कृष्ट फटका खेळल्यानंतर नॉन स्ट्राईकवर असलेल्या इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरे सेलिब्रेशन करताना दिसते. विशेष म्हणजे तो जडेजा फेम तलवारबाजी स्टाईलमध्ये हे सेलिब्रेशन करताना दिसते.  

हेही वाचा : सीएसकेची बलस्थाने आणि कमजोरी, पाहा कसा आहे धोनीचा संघ

क्रिकेटच्या मैदानात अर्धशतक किंवा शतकी खेळीनंतर रविंद्र जडेजा 'तलवारबाजी' स्टाइलमध्ये आनंद व्यक्त करताना पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये सॅम कुरेन याने त्याची नक्कल करुन आगामी हंगामात तेवर दाखवण्यासाठी चेन्नईचा संघ तयार असल्याचे संकेत दिले आहेत. टीम इंडियाविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात सॅम कुरेन याने एकाकी झुंज दिली होती. त्याच्या ही खेळी चेन्नई सुपर किंग्जला दिसाला देणारी होती. आगामी हंगामात तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या