IPL 2021: रैना-रायडू यांनी तयार केली बिर्याणी; पाहा व्हायरल Video

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्स संघानं व्हिडिओ पोस्ट केला आहे.

IPL 2021 : महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची यंदाच्या आयपीएल (IPL 2021) हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली. ऋषभ पंतच्या दिल्ली संघाकडून चेन्नईला सात विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाला विसरुन १६ एप्रिल रोजी पंजाब विरुद्ध होणाऱ्या सामन्यावर सीएसकेनं लक्ष केंद्रीत केलं असून तयारीला लागले आहेत. मोकळ्या वेळेत खेळाडू आनंद लुटत असल्याचेही दिसत आहे. याचा एक व्हिडिओ चेन्नई संघानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. यामध्ये खेळाडू जेवण तयार करत आहेत. शिवाय सर्वजण बसून त्याचा अस्वाद घेत असल्याचेही दिसतेय.  

सीएसकेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत सुरेश रैना आणि अंबाती रायडू किचनमध्ये बिर्याणी तयार करत असल्याचे दिसत आहे. या दोघांनी स्वयपाकीचे कपडेही परिधान केले आहेत. दोघांनी बिर्याणी तयारी केल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. या दोघांशिवाय इतर खेळाडूही किचनमध्ये विविध पदार्थ तयार करत असल्याचे दिसत आहे. 

पाहा व्हिडिओ

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कोणताही खेळाडू निराश नसल्याचं दिसत आहे. प्रशिक्षक, स्टाफ आणि खेळाडू हॉटेलमध्ये या जेवणाचा अस्वाद घेत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला स्टीफन फ्लेमिंग, माइक हसी आणि शार्दुल ठाकुर हॉटलच्या स्वीमिंग पूलजवळ नाश्ता करताना दिसत आहेत. अडीच मिनिटाच्या व्हिडिओत संघाचा कर्णधार धोनी आणि त्याचा परिवार कुठेही दिसत नाहीत.  
 

 


​ ​

संबंधित बातम्या