'ही दोस्ती तुटायची नाय'; रैनाने खास कॅप्शनसह शेअर केला धोनीसोबतचा फोटो

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 1 April 2021

त्याने मागील स्पर्धेत ल्यानंतर काही अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चर्चाही रंगली.

सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या मैत्रीची किस्से नवे नाहीत. धोनीने ज्यादिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्याच दिवशी रैनानेही त्याच्या पावलावर पाउल टाकत क्रिकेटला बायबाय केले. 15 ऑगस्ट 2020 रोजी एक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रैनाने आयपीएलच्या मैदानात एकत्र खेळत राहू, असा संदेशही दिला होता. पण मागील स्पर्धेत त्याने अचानक धोनीची साथ सोडली. वैयक्तिक कारण देत तो युएईहून मायदेशी परतल्यानंतर काही अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चर्चाही रंगली.

हा वाद धोनी आणि रैना यांच्यातील मैत्रीत दरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो की काय असेही अनेकांना वाटले असेल. पण आयपीएलच्या लिलावापूर्वी सीएसकेने रैनाला रिटेन केले आणि धोनी-रैना जोडी पुन्हा एकाच संघात दिसणार यावर शिक्कामोर्तब झाले. आयपीएलच्या नव्या हंगामासाठी CSK च्या गड्यांनी कंबर कसली आहे. मुंबईच्या मैदानात संघ प्रॅक्टिस करत असून रैनाने एका खास कॅप्शनसह शेअर केलेला धोनीसोबतचा एक फोटो चांगलाच चर्चेत आहे.

IPL 2021 : CSK मध्ये एन्ट्री करताच पुजाराने केली षटकारांची बरसात (VIDEO)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या फोटोत दोघे एकमेकांकडे न पाहता बॅटकडे पाहत असल्याचे दिसते. प्रत्येकवेळी नजरेला नजर मिळावीच असे नाही पण दोन्ही मन कायम जुळलेली असायला हवीत, अशा शब्दांत रैनाने कॅप्टन कूल धोनीसोबतची दोस्ती तुटायची नाही, असा संदेश दिलाय.  यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यात धोनी, रैना, सॅम करन हे आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची तयारी करताना पाहायला मिळाले होते.  या व्हिडिओत धोनी-रैना दोघांनी पहिल्यांदा नेटमध्ये फलंदाजी केली. त्यानंतर या दोघानी सॅम करनच्या नेटमध्ये बॅटिंग करतानाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले होते.  


​ ​

संबंधित बातम्या