IPL 2021 : त्या चुकीच्या Covid-19 रिपोर्टमुळे दिल्ली हरली?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 16 April 2021

आयपीएलमध्ये कोविड 19 (Covid 19) टेस्टवेळी चुकीचा रिपोर्ट आलेला नोर्तजे दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणाचा एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता

दिल्ली कॅपिटल्सचा (DC) जलदगती गोलंदाज एनरिक नोर्तजेचा कोविड-19 रिपोर्ट चुकीचा आल्यामुळे त्याला दोन दिवस जादा क्वारंटाईन रहावे लागले. शुक्रवारी  क्वांरटाईनमधून मुक्त झालेला नोर्तजे पुढच्या सामन्यात मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय. दक्षिण आफ्रिकेहून आयपीएल स्पर्धेसाठी भारतात आल्यानंतर सक्तीच्या  क्वांरटाईनमध्ये असताना नोर्तजेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याचा क्वारंटाईनचा कालावधी वाढला. आरटी-पीसीआर तपासणीवेळी त्याचा रिपोर्ट तीनवेळा निगेटिव्ह आल्यानंतर आता त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आलीये.  

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ट्विटच्या माध्यमातून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिलीये. नोर्तजेचा तीन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो खेळाडुंसाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये दाखल झालाय. तो बॉलिंग करताना दिसावा याची आम्ही प्रतिक्षा करत आहोत, असा उल्लेख दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटमध्ये केलाय. फ्रेंचायझी टीमने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये नोर्तजे क्वारंटाईनमधून मुक्त झाल्याने आनंदीत झाल्याचे पाहायला मिळते. सर्वांसमोर नाष्टा करताना खूप आनंदी आहे. सरावासाठी मैदानात उतरण्यास उत्सुक आहे, असेही त्याने म्हटले आहे.

BCCIच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नटराजन का नाही; जाणून घ्या कारण

आयपीएलमध्ये कोविड 19 (Covid 19) टेस्टवेळी चुकीचा रिपोर्ट आलेला नोर्तजे दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणाचा एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पुढील रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो पहिल्या सामन्यापासून खेळताना दिसले होते. दिल्लीच्या ताफ्यात असणारा रबाडा आणि नोर्तजे सोबतच भारतात दाखल झाले. सात दिवसांच्या सक्तीच्या क्वारंटाईनंतर रबाडा राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसले. पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नोर्तजे या सामन्याला मुकला होता. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने डेथ ओव्हर्समध्ये मार खाल्ला. जर नॉर्तजे खेळला असता तर कदाचित सामन्याचा निकाल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागले होते. 


​ ​

संबंधित बातम्या