IPL 2021 : गब्बर बोल्ड: नव्वदीच्या घरात असा शॉट कोण खेळत? (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 18 April 2021

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत शिखर धवनने सलग दोन शतके करत आयपीएलमध्ये अनोखा विक्रम रचला होता.

IPL 2021, DC vs PBKS  : पंजाब किंग्जने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनेही दिमाखात सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ 17 चेंडूत 32 धावा करुन परतल्यानंतर अनुभवी शिखर धवनने आपल्या भात्यातून सुरेख फटकेबाजी करत संघासाठी उपयुक्त खेळी केली. पण नव्वदीच्या घरात असताना रिचर्डसनने त्याला बोल्ड केलं. धवनचे आयपीएलमधील तिसरे शतक 8 धावांनी हुकले. त्याने 49 चेंडूत 92 धावा केल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत शिखर धवनने सलग दोन शतके करत आयपीएलमध्ये अनोखा विक्रम रचला होता. मागील वर्षी पंजाब विरुद्धच त्याने दुसरे शतक ठोकले होते. यंदाच्या हंगामात तो आयपीएलमधील तिसरे शतक सहज पूर्ण करेल, असे वाटत होते. पण तो मोक्याच्या क्षणी आउट झाला. 

पंजाबने पहिल्यांदा बॅटिंग करताना दमदार सुरुवात केली. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 122 धावा केल्या. ही जोडी माघारी फिरल्यानंतर गेल आणि पूरन स्वस्तात बाद झाले. शाहरुख 15 (5) आणि 22 (13) यांच्या फटकेबाजीमुळे पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्ससमोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

IPL 2021, RCB vs KKR : मक्सवेल समोरच पडिक्कलने केली त्याची कॉपी (VIDEO)

या धावाचा पाठलाग करताना धवन-पृथ्वीने दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. पृथ्वी माघारी घेतल्यानंतर धवनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. 31 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. नव्वदीच्या घरात रिचर्डसनला चुकीचा फटका खेळताना धवन बोल्ड झाला. त्याचे शतक हुकले तरी 92 धावांची त्याची खेळी संघाच्या विजयासाठी मोलाची ठरली.    
 


​ ​

संबंधित बातम्या