IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

सकाळ स्पोर्ट्स टीम
Tuesday, 6 April 2021

जाणून घेऊयात पंतला खुणावणाऱ्या खास रेकॉर्डबद्दल. 

आयपीएल (IPL) च्या 14 व्या हंगामाची सुरुवात होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत.  (IPL 2021) मधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 9 एप्रिलला रंगणार आहे. नव्या हंगामात आपल्याला संघासह काही खेळाडूंच्या नावे खास रेकॉर्ड झाल्याचे पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी विराजमान होऊन ट्रेलर दाखवणाऱ्या रिषभ पंतलाही यंदाच्या हंगामात काही खास रेकॉर्ड खुणावत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून तो ज्या फॉर्ममध्ये दिसतोय ते पाहता यंदाचा हंगाम तो गाजवेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना कामगिरीत सातत्य ठेवून तो लक्षवेधी ठरणार का? ते येणारा काळाच ठरवेल.   

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

पंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये 68 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे 2079 धावा आहेत.  यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला आपल्या कामगिरीतील सातत्याच्या जोरावर काही खास विक्रम करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात पंतला खुणावणाऱ्या खास रेकॉर्डबद्दल. 

# आयपीएलमध्ये पंतने (Rishabh Pant in IPL) ने आतापर्यंत 2079 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडच्या नावे आयपीएलमध्ये 2174 धा आहेत. हा विक्रम पंत सहज मागे टाकेल. त्याच्याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयपीएलमध्ये  2334 धावा असून अष्टपैलू जॅक कॅलिसच्या नावे 2427 धावा आहेत. या दिग्गजांना मागे टाकण्याची संधी पंतकडे असेल.  

# या हंगामात 25 चौकार खेचून पंतला टी-20 क्रिकेट मध्ये चौकाराचे त्रिशतक करण्याचीही संधी आहे. 

# आयपीएलमध्ये चौकारांचे द्विशतक करण्यापासून तो 17 चौकार दूर आहे. 17 चौकार खेचल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून 200 चौकार खेचणारा तो दुसरा फलंदाज ठरेल. दिल्लीकडून खेळताना विरेंद्र सेहवागने 266 चौकार लगावले आहेत.  

# रिषभ पंत 4 कॅचसह आयपीएलमध्ये  50 कॅच पूर्ण करेल. आयपीएल 2021 मध्ये ही कामगिरी पंत सहज आपल्या नावे करु शकतो.   

# विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये 50 कॅच पूर्ण करण्यासाठी पंतला केवळ 7 कॅच घ्यावे लागतील. आयपीएलमधील दिल्लीच्या संघाकडून असा पराक्रम करणारा तो पहिला विकेटकीपरही होईल. 
 
 


​ ​

संबंधित बातम्या