विराटनं रोहितला धावबाद केल्यानंतर मिम्सचा धुमाकूळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 April 2021

IPL 2021 : मुंबईचा पराभव करत विराटच्या आरसीबीनं यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली.

IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि क्रिस लीन या जोडीने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हंगामातील पहिला षटकार खेचणाऱ्या रोहित शर्माने धावबादच्या रुपात विकेट फेकली. डावातील चौथ्या षटकात त्याने युजवेंद्र चहलला मिड ऑनच्या दिशेने षटकार खेचला. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला. त्याने 15 चेंडूत 19 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात क्रिस लीनने खेळलेल्या शॉटवर नॉन स्ट्राईकला असलेल्या रोहितने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. तो अर्ध्या क्रिजमध्ये पोहचल्यानंतर लीनने त्याला माघारी धाडले. विराट कोहलीने चहलकडे चेंडू फेकत रोहितच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर चांगलाच निराश झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावरुन दिसत होते. रोहित शर्माला विराट कोहलीनं धावबाद केल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.. पाहूयात काही मजेदार मिम्स...


​ ​

संबंधित बातम्या