IPL 2021 : लिलावा आधी फ्रँचायझींची खेळी; जाणून घ्या रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

राजस्थान रॉयल्सच्या संघाने सर्वात मोठा निर्णय घेत स्टीव्ह स्मिथला रिलीज करत संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे दिले. याशिवाय धोनीच्या संघात सुरेश रैना कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले. मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगाला रिलीज केले. 

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 14 व्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावापूर्वी या स्पर्धेतील फ्रँचायझींनी रिटेन आणि रिलीज (Released And Retained by IPL team) केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. फेब्रुवारीमध्ये आयपील 2021 साठी मिनी ऑक्शन प्रक्रिया होणार आहे. यापूर्वी लिलावाचा विचार करुन संघांनी रिटेन आणि रिलीज करणाऱ्या खेळाडूंची यादी तयारी केली होती.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने सर्वात मोठा निर्णय घेत स्टीव्ह स्मिथला रिलीज करत संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे दिले. याशिवाय धोनीच्या संघात सुरेश रैना कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले. मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगाला रिलीज केले. सर्व संघानी मिळून अनेक खेळाडूंना रिलीज केले. जाणून घेऊयात संपूर्ण यादी 

1-मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 
 

रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी : आयपीएलच्या सुरुवातीपासून संघाचा भाग असलेल्या श्रीलंकेचा स्टार लसिथ मलिंग याला रिलीज केले. त्याच्याशिवा. नॅथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिंसन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख  

रिटेन खेळाडूंची यादी : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रिस लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंह

मुंबई इंडियन्सच्या खात्यात शिल्लक रक्कम 15.5 कोटी 

 

2. चेन्नई सुपरकिंग्स 

रिलीज खेळाडूंची यादी : मोनू सिंह, हरभजन सिंह, शेन वॉट्सन, मुरली विजय, पीयूष चावला

रिटेन खेळाडूंची यादी : चेन्नई सुपर किंग्ज स्टार क्रिकेटर सुरेश रैना (11 कोटी) रिटेन केले. याशिवाय ड्वेन ब्रावो आणि फाफ डु प्लेसिसिलाही रिटेन केले. एमएस धोनी, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिचेल सँटनर, आर साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, आणि सॅम करन.

चेन्नई सुपर किंग्जच्या खात्यातील शिल्लक रक्कम 22.9 कोटी  
 

3. किंग्स इलेव्हन पंजाब 

रिलीज खेळाडूंची यादी :  ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल, कृष्णप्पा गौतम, मुजीब उर रहमान, जिमी नीशमस हार्डस विलोन, करूण नायर

पंजाबच्या खात्यातील शिल्लक शिल्लक रक्कम 53.2 कोटी 

4. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 

रिलीज खेळाडूंची यादी :  क्रिस मॉरिस, एरोन फिंच, मोइन अली, इसुरु उडाना, डेल स्टेन, शिवम दूबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरत मान, पार्थिव पटेल 

रिटेन खेळाडूंची यादी : विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पदिक्कल, वाशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, एडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे

रॉयल चॅलेंज बंगळुरुच्या खात्यातील शिल्लक रक्कम 35.7 कोटी 

5. सनरायझर्स हैदराबाद 

रिलीज खेळाडूंची यादी : बिली स्टेनलेक, विराट सिंह, बावनका संदीप, फॅबियन एलन आणि संजय यादव

रिटेन खेळाडूंची यादी: केन विलियमसन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, टी नटराजन, शहबाज नदीम, राशिद खान, बासिल थम्पी, सिद्धार्थ कौल

सनरायझर्स हैदराबादच्या खात्यातील शिल्लक रक्कम 10.75 कोटी 

6. कोलकाता नाईट रायडर्स

रिलीज खेळाडूंची यादी: टॉम बेंटन, क्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाइक, हॅरी गर्नी, एम सिद्धार्थ

रिटेन खेळाडूंची यादी: शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिंस, इयोन मोर्गन, वरुण चक्रवर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी

कोलकाताच्या संघाच्या खात्यात शिल्लक असणारी रक्कम 10.85 कोटी 

7. राजस्थान रॉयल्स

रिलीज खेळाडूंची यादी : स्टीव स्मिथ, ओशेन थॉमस, अंकित राजपूत, आकाश सिंह, टॉम करेन, वरुण आरोन, शशांक सिंह, अनिरुद्ध
खात्यातील शिल्लक 

राजस्थान रॉयल्सच्या खात्यातील शिल्लक रक्कम 34.85 कोटी 

8. दिल्ली कॅपिटल्स 

रिलीज खेळाडूंची यादी :  मोहित शर्मा, तुषार देशपांडे, केमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स केरी, जेसन रॉय

रिटेन खेळाडूंची यादी : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, मार्कस स्टोयनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स

Tags


​ ​

संबंधित बातम्या