सुपरफ्लॉप झाल्यानंतरही मॅक्सवेलवर का होतेय पैशांची उधळण?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

IPL 2021 :  ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर आयपीएलमध्ये पैशांचा पाऊस करतो? याचं कारण गौतम गंभीर यानं सांगितलं आहे.

IPL 2021 :  आयपीएलच्या गेल्या काही हंगामापासून ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल स्पशेल अपयसी ठरला आहे. त्याची कामगिरी आपल्या लौकिकास नसल्याचं आकडेवारीवरुन दिसून येतेय. पण प्रत्येक आयपीएलमध्ये संघमालक त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचेही दिसत आहे. यामागे नेमकं काय कारण असेल, असा प्रश्न प्रत्येक क्रीडा प्रेमींना पडला असेलच. याचं उत्तर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर यानं दिलं आहे. 

IPL 13 मध्ये खराब निराशाजनक कामगिरी - 
युएई येथे पार पडलेल्या गतवर्षीच्या आयपीएल हंगामात पंजाबकडून खेळताना मॅक्सवेलनं निराशाजनक कामगिरी केली होती. या संपूर्ण हंगामात मॅक्सवेल याला एकही षटकार लगावता आला नव्हता. त्याच्या खराब कामगिरीनंततर पंजाब संघानं त्याला रिलीज केलं होतं. फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात आरबीसीनं त्याला १४.२५ कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलं.

हेही वाचा : रोहितसह मुंबईच्या खेळाडूंनी मराठी गाण्यावर धरला ठेका; पाहा व्हिडिओ 

मॅक्सवेलवर कोट्यवधी का खर्च करतात? 
वर्षानुवर्षे खराब कामगिरी केल्यानंतरही मॅक्सवेलवर कोट्यवधी रुपयांची उधळण होत असते. याबाबत गौतम गंभीर यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना गंभीर म्हणाला की, ' मॅक्सवेलच्या कामगिरीत सातत्य राहिलं नाही. आपण त्याला खेळण्यास मोकळीक नाही असं म्हणून शकत नाही. दिल्लीकडून खेळताना त्याला फटकेबाजी करण्याचं संपूर्ण स्वतंत्र होतं. पण झालं काय?'

गंभीरनं सागितलं कारण-
गंभीर म्हणाला की, 'प्रत्येक IPL संघाला मॅक्सवेलमध्ये एक्स फॅक्टर दिसत असल्यामुळे संधी देतात. पण २०१४ चा हंगाम वगळता मॅक्सवेलला आपली छाप सोडता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना मॅक्सवेलची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे त्यामुळेच त्याच्यावर पैशांचा पाऊस पडतोय.'
 


​ ​

संबंधित बातम्या