क्रिकेटसाठी अमेरिकेत जायची संधी सोडली, अन् झाला IPL हिरो; वाचा हर्षलचा रोमहर्षक प्रवास

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 April 2021

IPL 2021 : हर्षल पटेल याला २०१० मध्ये मुंबईच्या संघानं विकत घेतलं होतं. मात्र, २०११ मध्ये आरसीबीनं पदार्पणाची संधी दिली

IPL 2021 : सलामीच्या सामन्यात आरसीबीनं मुंबईचा पराभव करत यंदाच्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली आहे. दिल्लीकडून ट्रेड केलेल्या हर्षल पटेल याच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर आरसीबीनं मुंबईचा सहज पराभव केला. ३० वर्षीय हर्षल पटेल यानं चार षटाकत २७ धावा खर्च करताना महत्वाच्या पाच विकेट घेतल्या.  पहिल्या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हर्षल पटेल याच्याबाबत खूप कमी लोकांना माहित आहे. २००५ मध्ये हर्षल पटेल याला कुटुंबातील सदस्यासोबत दिल्लीला जाण्याचा पर्याय दिला होता. पण क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी हर्षलनं भारतातच राहाण्याचा निर्णय घेतला.  हर्षलचा भाऊ तपन यानेही या निर्णयाचं समर्थनं केलं. हर्षल पटेलनं जूनियर क्रिकेटमध्ये धासू प्रदर्शन केलं. 2008-09 मध्ये अंडर-19 वीनू मांकड ट्रॉफीमध्ये त्यानं २३ विकेट मिळवल्या होत्या. 

2010 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपच्या भारतीय संघात हर्षल पटेल याचेही नाव होतं. याच कालावधीत गुजरात संघात निवड न झाल्यामुळं हर्षलनं हरयाणाचा रस्ता धरला होता.  2011-12 रणजी सत्रात क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये लागोपाठ दोन वेळा ८-८ विकेट घेतल्या होत्या. सध्या हर्षल हरयाणा संघाचा कर्णधार आहे. 

हेही वाचा : पराभवानंतर रोहितची प्रतिक्रिया....

आयपीएलच्या अखेरच्या पाच हंगामात हर्षल पटेल याला फक्त १८ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. २०२१ मधील हंगामात पहिल्याच सामन्यात ५ विकेट घेण्याचा कारनामा केला. मुंबईनं हर्षलला ८ लाख रुपयात खरेदी केलं होतं. पण त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी आरसीबीनं दिली होती.  २०१२ मध्ये हर्षलनं १२ सामन्यात ९ विकेट घेतल्या होत्या. २०१३ मध्ये हर्षलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 2014 मध्ये तीन सामन्यात ४ विकेट घेतल्या. २०१५ चा हंगाम हर्षलसाठी सर्वात चांगला होता. त्यानं या हंगामात १५ सामन्यात १७ विकेट घेतल्या होत्या.  

धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

गतवर्षी हर्षल पटेल याला दिल्लीकडून फक्त पाच सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्यानं तीन विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या हंगामापूर्वी आरसीबीनं हर्षलला दिल्लीकडून ट्रेड केलं. २०१९ मध्ये हर्षलनं २ सामन्यात २ विकेट घेतल्या होत्या. २०१८ मध्ये ५ सामन्यात ७ विकेट, २०१७ मध्ये एक सामन्यात ३ आणि २०१६ मध्ये पाच सामन्यात एक विकेट घेतल्या आहेत. हर्षल पटेलनं आयपीएलच्या ४९ सामन्यात ५१ विकेट घेतल्या आहेत. तसेच १३२  धावा चोपल्या आहेत.

हेही वाचा ; MIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

हर्षल पटेल याच्या कारकिर्दीवर नजर मारल्यास... त्यानं ६४ प्रथम सत्र सामन्यात २२६ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान १४ वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. फलंदाजी करताना १३६३ धावाही चोपल्या आहेत. हर्षल पटेल यानं ९७ टी-२० सामन्यात१०३ बळी घेतले आहेत. आणि ७९१ धावाही केल्या आहेत.  
 


​ ​

संबंधित बातम्या