IPL 2021 : कोरोनातून सावरलेल्या KKR च्या राणादाची स्फोटक खेळी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 11 April 2021

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या नियमानुसार सलग दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले होते.

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्संचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक गमावली. पण सलामी जोडीने अर्धशतकी खेळी करुन संघाच्या डावाला चांगली सुरुवात करुन दिली. शुभमन गिलच्या रुपात KKR ला पहिला झटका बसला. या सामन्यात नितीश राणाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. कोरोनातून सावरुन संघाच्या ताफ्यात सामील झालेल्या या गड्याने सुरुवातीपासून सकारात्मक खेळ केला. त्याने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.  

आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी नितीश राणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर 3 एप्रिलला तो संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला. 27 वर्षीय नितीश राणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो खेळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्याने यातून सावरत दमदार सुरुवात केली आहे. 

IPL 2021 : भगव्याची शान कायम ठेवा; ऑरेंज आर्मीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या नियमानुसार सलग दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले होते. 11 आणि 12 व्या दिवशी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो संघासोबत जोडला गेला.  केकेआरने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन तो संघाला जॉईन झाल्याचे सांगताना  सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. 


​ ​

संबंधित बातम्या