बॅट-तोड यॉर्कर! RCBच्या सात फुटी गोलंदाजाची कमाल, पाहा Video

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 April 2021

IPL 2021  ; RCB च्या सात फूटी गोलंदाजानं क्रुणालला टाकला खतरनाक यॉर्कर! बॅटचे झाले दोन तुकडे; पाहा Video

IPL 2021: आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबी संघानं अटीतटीच्या लढतीत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केला. अखेरच्या चेंडूवर आरसीबीनं विजय मिळवत दोन गड्यांनी सामना खिशात घातला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईनं निर्धारित २० षटकांत १५९ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजीदरम्यान मुंबईच्या क्रुणाल पांड्याची बॅट तुटल्याचा प्रसंगही घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.  
 
विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १९ व्या षटकांत सात फूट उंच असलेला कायले जेमिसन गोलंदाजी करण्यासाठी आला होता.  कायले जेमिसन यानं आपल्या षटकातील तिसरा चेंडू जबरदस्त यॉर्कर टाकला. हा चेंडू इतका खतरनाक होता की फलंदाजी करणाऱ्या क्रुणाल पांड्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले. चेंडूला पाहून पांड्या हैरान झाला होता. कारण, त्याच्या हातात बॅटचा फक्त हँडल राहिला होता.  

पाहा व्हिडीओ - 

https://www.iplt20.com/video/228686/breaking-bat-the-jamieson-way

आयपीएल २०२१ साठी फेब्रुवारीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली होती. या लिलावात आरसीबीनं कायले जेमिसन याल १५ कोटी रुपये खर्चून आपल्या संघात घेतलं होतं. सात फूट उंच असणाऱ्या कायले जेमिसन यानं २०२० मध्ये भारताविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कायले जेमिसन यानं ४ षटकात २७ धावा देत एक विकेट घेतली.  


​ ​

संबंधित बातम्या