RCB समोर KKRचं पारडं जड; विराटचा संघ विजयाची हॅट्रिक साधणार का? 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 April 2021

RCB vs KKR,  2021 : विराट कोहलीचा आरसीबी विजयाची हॅट्रिक साधणार का? की बलाढ्य कोलकात संघ आपला दुसरा विजय नोंदवणार ?

IPL 2021 : एरव्ही अडखळत सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या आरसीबी संघानं यंदाच्या हंगामात दिमाखात प्रारंभ केला. मात्र, निसटत्या विजयानं आरसीबीला तारल्याचं विराट कोहली जाणतोय. मुंबईबरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूव विजय मिळला. तर हैदराबादच्या फलंदाजांनी केलेल्या चुकींमुळे दुसरा सामना आरसीबीच्या बाजूनं झुकला. तर दुसरीकडे कोलकाता संघानं जोरदार सलामी दिली, पण मुंबईविरुद्धात चुकीचे फटके मारत पराभव स्वीकारला. त्यामुळे विराट कोहलीचा आरसीबी विजयाची हॅट्रिक साधणार का? की बलाढ्य कोलकात संघ आपला दुसरा विजय नोंदवणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारं आहे.  

रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर यंदाच्या हंगामातील दहावा सामना बंगळुरु आणि कोलकाता यांच्यात रंगणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामना सुरु होणार आहे. गेल्या काही सामन्यावर नजर मारल्यास नाणेफेकीचा कौल महत्वाची भूमिका बजावणार यात कोणतीही शंका नाही. मर्यादीत षटकांमधील जगातील दोन दिग्गज कर्णधार, विराट कोहली आणि इयान मॉर्गन यांच्यातील मुकाबला पाहण्यासारखा ठरणार आहे. दोन्ही संघात बदलाची शक्यता कमीच जाणवतेय. आरसीबीपेक्षा कोलकाता संघाची गोलंदाजी अधिकच बलाढ्य दिसतेय. त्यामुळे आरसीमध्ये विराट, मॅक्सवेल आणि डिव्हिलिअर्स यांच्यासारखे मातब्बर फलंदाज आहेत. तर पॅट कमिन्स, हरभजन, शाकीब यांच्यासारखे दिग्गज कोलकाताकडे.... त्यामुळे हा सामना पाहणं रंचक ठरणार.... 

आयपीएलमधील रेकॉर्डवर नजर मारल्यास कोलकाताचं पारडं जड दिसतेय. 2008 पासून आतापर्यंत दोन्ही संघात आतापर्यंत 26 सामने झाले आहेत. यापैकी कोलकातानं 14 तर आरसीबीनं 12 सामन्यात बाजी मारली आहे. आकडेजरी कोलकाताच्या बाजूनं असले तरी मागील पाच सामन्यापैकी तीन सामन्यात आरसीबीनं बाजी मारली आहे.  

प्रतिस्पर्धी संघ -

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु : 

विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, एडम जाम्पा, डॅन क्रिश्चियन, डॅनियल सॅम्स, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, फिन एलेन, केन रिचर्डसन, के.एस भरत, कायल जेमिसन, मोहम्मद अजहरुद्दीन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, रजत पाटीदार, सचिन बेबी, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल. 

  • कोलकाता नाइट राइडर्स : 

इयोन मॉर्गन (कर्णार), आंद्रे रसेल, बेन कटिंग, दिनेश कार्तिक, हरभजन सिंह, कमलेश नागरकोटी, करुण नायर, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नीतीश राणा, पॅट कमिन्स, पवन नेगी, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, गुरकीरत सिंह मान, संदीप वॉरियर, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरेन, टिम सीफर्ट, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर


​ ​

संबंधित बातम्या