IPL 2021 : वॉर्नरच्या चुकीमुळे SRH चा पहिल्याच सामन्यात पराभव

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

IPL 2021, SRH vs KKR : क्रीडा तज्ज्ञाबरोबरच चाहत्यांनीही वॉर्नरच्या चुकीवर नाराजी व्यक्त केली.  

IPL 2021, SRH vs KKR : आयपीएल १४ हंगामातील पहिल्याच सामन्यात कोलकाताकडून सनराइजर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. १८८ धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाचा डाव सावरला होता. मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, कोलकाता नाइट राइडर्सच्या पॅट कमिन्सनं बेयरस्‍टोला बाद करत हैदराबादला बॅकफूटवर ढकललं. 

सामन्यानंतर पंत काय म्हणाला?

बेयरस्‍टो बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नरनं नबीला फलंदाजासाटी पाठवलं. वॉर्नरच्या या निर्णयावर क्रीडा तज्ज्ञ आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.कारण विजयासाठी संघाला प्रति षटक ११ नं धावा चोपायच्या होत्या. अशा परिस्थितीत नबीनं संथ फलंदाजी करत धावांचा पाठलाग आणखी अवघड केला. नबीनं मोक्याच्या क्षणी ११ चेंडूत फक्त १४ धावांची खेळी केली. नबी बाद झाल्यानंतर विजयला पाठवला. विजयलाही मोठे फटके मारण्यात अपयश आलं. अब्दुल समदमध्ये मोठे फटके मारण्याचं कौशल्य असतानाही त्याला फलंदाजीला खूपच खाली पाठवल्यामुळे सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे. १९ वर्षीय समदनं अखेरच्या दोन षटकात तुफान फटकेबाजी केली मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नबी आणि विजय शंकरऐवजी वॉर्नरनं समदला प्रमोट करायला हवं होतं. असं चाहत्यांसह क्रीडा तज्ज्ञांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर केली.  

पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी

विजय शंकर १८ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला. अब्दुल समद मैदानात आल्यानंतर १२ चेंडूत विजयासाठी ३८ धावांची गरज होती. समदनं पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. समदनं आपल्या छोटेखानी खेळीत दोन षटकारांसह धावांचा पाऊस पाडला. मात्र,  तोपर्यंत वेळ निघून गेला होता. मात्र, समदनं आपल्याला फलंदाजीत प्रमोट करायला हवं होतं. हे दाखवून दिलं. अखेर कोलकाता संघानं हैदराबादचा दहा धावांनी पराभव केला.   


​ ​

संबंधित बातम्या