हैदराबाद पराभवाची हॅट्‍ट्रिक टाळणार की मुंबई विजयाची लय कायम राखणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 April 2021

IPL 2021, MI vs SRH : मुंबईविरोधात विजयाचं खातं उघडण्यासाठी हैराबाद उतरणार मैदानात 

IPL 2021, MI vs SRH : यंदाच्या आयपीएल हंगामातील आपल्या पहिल्या वहिल्या विजयासाठी डेविड वॉर्नरचा हैदराबाद संघ आज मैदानात उतरणार आहे. पहिले दोन्ही सामने गमावणारा हैदराबादचा संघ चेन्नईच्या मैदानावर बलाढ्य मुंबईविरोधात पुनरागमनासाठी मैदानात उतरेल.   आरसीबीविरोधात पराभवानं सुरुवात केल्यनंतर दुसऱ्या सामन्यात विजय संपादन करत मुंबईची गाडी रुळावर आली. गत सामन्यात केलेल्या चुका हैदराबाद सुधारणार, की सापडलेली लय मुंबई कायम राखणार याची उत्सुकता आजच्या सामन्यात असेल.

रॉयल चेलेंजर बंगळुरुविरोधात चांगल्या सुरुवातीनंतर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती.  त्यामुळेच हैदराबा संघ जिंकता जिंकता हरला होता. मोक्याच्या क्षणी फलंदाजांनी आपली विकेट फेकली होती. तिसऱ्या सामन्यात हैदराबादचे फलंदाज ही चूक टाळतील. लागोपाठ दोन पराभव झाल्यानंतर विल्यम्सनला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात यावं अशी मागणी केली जातेय. फलंदाजी अधिक मजबूत करण्यासाठी विल्यम्सन संघात असायला हवा, असा सल्ला माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि संजय मांजरेकर यांनी दिला आहे. 

गतविजेत्या मुंबई संघात ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यासारखे दिग्गज फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत हैदराबादला अनुभवी फलंदाजांची आवशकता भासणार आहे. बोल्ट  आणि डेविड वार्नर यांच्यातील सामना पाहण्यासारखा होईल, असा अंदाज क्रीडा प्रेमींनी बांधला आहे.  दुसरीकडे राशीद खानचा सामना करणं मुंबईच्या फलंदाजांसाठी मोठं आव्हान असेल. गेल्या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनीही नांगी टाकली होती. अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावत विजय मिळवला असला, तरी मुंबईच्या खेळात अजून सुसूत्रता आलेली नाही. डेथ ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाचा कमकुवतापणा दिसत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे आरसीबीबरोबर पराभवाचा सामना करावा लागला होता. तर कोलकाताच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळाला. 
 
संथ खेळपट्टी
चेन्नईची खेळपट्टी संथ झालेली आहे. दुसऱ्या डावात १५० धावांचा पाठलाग करतानाही दमछाक होत आहे. विराट कोहलीनेही याची कबुली दिली आहे. त्यामुळे नव्या चेंडूवर जास्तीत जास्त धावा करून नंतर संयमाने फलंदाजी करण्यावर भर दिला जाईल. चेंडूला फिरकही मिळत असल्याने हैदराबादचा रशीद खान मुंबईच्या फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. हैदराबादने पहिले दोन्ही सामने गमावलेले असले, तरी रशीदची फिरकी प्रभावी ठरलेली आहे.

प्रतिस्पर्धी संघ - 
मुंबई :
रोहित शर्मा (कर्णधार), एडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मार्को जानसेन, मोहसिन खान, नाथन कोल्टर नाइल, पियूष चावला, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि युद्धवीर सिंह.

हैदराबाद : डेविड वार्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बासिल थाम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, साहा (विकेटकीपर), अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंह, केदार जाधव, मुजीब उर रहमान आणि जे. सुचित.


​ ​

संबंधित बातम्या