MI vs DC : मिश्राने सातव्यांदा केली रोहितची शिकार, पांड्या पोलार्डही लागले गळाला (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 20 April 2021

त्याच षटकात अमित मिश्राने हार्दिक पांड्याला माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आले नाही. 

IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Match : टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईचा संघ दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. स्टॉयनिसने क्विंटन डिकॉकला स्वस्तात माघारी धाडल्यानंतर सेट झालेल्या रोहित शर्माची अमित मिश्राने विकेट घेतली. त्याने सातव्यांदा रोहितची शिकार केली. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी तो एकटा लढला. रोहित शर्माने 30 चेंडूत 44 धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथने रोहितचा झेल टिपला. त्याच षटकात अमित मिश्राने हार्दिक पांड्याला माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आले नाही. 

 

IPL 2021: धोनी लवकरच थांबेल, वॉनचं CSK च्या नव्या कॅप्टनसंदर्भात मोठे विधान

38 वर्षीय अमित मिश्राला दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच संधी दिलीये. अमित मिश्राने 152 सामन्यातील 152 डावात 163 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा अमित मिश्राच्या नावे आहे. त्याने तब्बल तीनवेळा हॅटट्रिक घेतली आहे. तीनवेळा मिश्राने चार पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. एकदा त्याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अमित मिश्राने रोहित शर्मा, हार्दिक पाड्या आणि केरॉन पॉलार्ड या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या.

 2008 च्या पहिल्या हंगामात अमित मिश्राने डेक्कन चार्जस हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 17 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या होत्या 2011 च्या हंगामात पंजाब विरुद्ध त्याने 9 धावांत 4 गडी बाद केले होते. 2016 मध्ये 3 षटकात 11 धावा खर्च करत 4 विकेट, 2013 च्या हंगामात 4 षटकांच्या कोट्यात 19 धावा खर्च करुन चार विकेट्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 24 धावांत 4 विकेट घेतल्या,  आयपीएलमध्ये चारवेळा त्याने चार विकेट घेण्याची कामगिरी आपल्या नावे केलीय.


​ ​

संबंधित बातम्या