IPL 2021: धोनी लवकरच थांबेल, वॉनचं CSK च्या नव्या कॅप्टनसंदर्भात मोठे विधान

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 20 April 2021

महेंद्रसिंह धोनी आणखी 2-3 वर्ष आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.

इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटर मायकल वॉन (Michael Vaughan) याने चेन्नई सुपर किंग्जमधील (CSK) महेंद्र सिंह धोनीचा उत्तराधिकारी कोण? यासंदर्भात भविष्यवाणी केलीय. चेन्नई सुपर किंग्जच्या आगामी नेतृत्वाच्या शर्यतीत रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आघाडीवर असेल, असे मत मायकल वॉन याने व्यक्त केले आहे. महेंद्रसिंह धोनी आता खूप काळ चेन्नई किंग्जच्या ताफ्यासोबत असणार नाही. त्यामुळे चेन्नईच्या संघाने आता रविंद्र जडेजाच्या हिशोबाने टीम बांधणी करायला हवी, असे वॉन यांनी म्हटले आहे. रविंद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू असून त्याची मानसिकताही कणखर असल्याचा उल्लेखही मायकल वॉन यांनी केलाय.  

वॉनने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीमध्ये चेन्नई सुपर किंग्जसंघाबाबत भाष्य केले. तो म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी आणखी 2-3 वर्ष आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. यापेक्षा अधिक काळ तो चेन्नईसोबत असणार नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या टीम मॅनेजमेंटला त्याचा उत्तराधिकारी शोधायला हवा. एक खेळाडू निवडून त्याच्या हिशोबाने टीम बांधणी करण्याची तयारी सुरु करण्याची वेळ आली आहे. रविंद्र जडेजा हा बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग तिन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा खेळाडू आहे. हा चेन्नईकडे एक चांगला पर्याय असेल, असे मत वॉन यांनी मांडले.  

राजस्थानचे 12 वाजवणाऱ्या जड्डूने मैदानातून कुणाला लावला फोन? (VIDEO)

जडेजा बॅटिंग ऑर्डरमध्ये लवकर येऊ शकतो. गोलंदाजीमध्ये तो नव्या चेंडूवर संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकतो.  बॅटिंगमध्ये जडेजा चार-पाच क्रमांकावर खेळू शकतो. फिल्डिंगवेळी त्याला तुम्ही मोक्याच्या जागेवर उभा करु शकता. अष्टपैलू गुण असल्यामुळे धोनीचा वारसदार म्हणून तो सर्वात आघाडीवर असेल, असे वॉन म्हणाला. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये रविंद्र जडेजाने लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने बटल आणि शिवम दुबेला बाद करुन हातून निसटलेला सामना चेन्नईच्या बाजुने वळवला. दोन महत्त्वाच्या विकेट मिळवून दिल्यानंतर फिल्डिंगवेळी त्याने चार कॅच घेऊन सामन्यात आपली विशेष छाप उमटवल्याचे पाहायला मिळाले होते.  


​ ​

संबंधित बातम्या