MIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 9 April 2021

मुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात क्रिस लीनने खेळलेल्या शॉटवर नॉन स्ट्राईकला असलेल्या रोहितने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडले.

चेन्नई :  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 14 व्या हंगामातील पहिला षटकार खेचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि क्रिस लीन या जोडीने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हंगामातील पहिला षटकार खेचणाऱ्या रोहित शर्माने धावबादच्या रुपात विकेट फेकली. डावातील चौथ्या षटकात त्याने युजवेंद्र चहलला मिड ऑनच्या दिशेने षटकार खेचला. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला. त्याने 15 चेंडूत 19 धावा केल्या.

IPL 2021: सेंच्युरी करुन कोहलीला इम्प्रेंस करणाऱ्या गड्याला मिळाली पदार्पणाची संधी 

मुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात क्रिस लीनने खेळलेल्या शॉटवर नॉन स्ट्राईकला असलेल्या रोहितने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. तो अर्ध्या क्रिजमध्ये पोहचल्यानंतर लीनने त्याला माघारी धाडले. विराट कोहलीने चहलकडे चेंडू फेकत रोहितच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर चांगलाच निराश झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावरुन दिसत होते. आयपीएलच्या कारकिर्दीतील 201 वा सामना खेळत असताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण पहिल्यांदाच क्रिस लीनसोबत डावाची सुरुवात करताना दोघांमध्ये ताळमेळाची उणीव असल्याचे दिसून आले.  

Brought to you by

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीला म्हणावे तसे यश लाभलेले नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिले जेतेपद मिळवण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात दोन्ही संघाचे रेकॉर्ड पाहता मुंबईसाठी हे मैदानात लकी आहे. मुंबईने पाच सामने जिंकले असून बंगळुरुला पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.   


​ ​

संबंधित बातम्या