धोनीला दुहेरी झटका; सामना तर गमावलाच, आर्थिक दंड झाला तो वेगळाच

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 April 2021

IPL 2021 दिल्लीबरोबर पराभव स्वीकारत चेन्नईनं आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरुवात पराभवानं केली आहे. या पराभवासोबत धोनीला आणखी एक धक्का बसला

IPL 2021 CSK vs DC : शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जचा सहज पराभव केला. मुंबई येथील वानखेडे मैदानात रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सात गडी आणि 8 चेंडू राखून विजय नोंदवला. पंतच्या नेतृत्वाची दमदार सुरुवात करण्यासाठी धवन आणि पृथ्वीने दाखवलेला शो उपयुक्त ठरला. दिल्लीबरोबर पराभव स्वीकारत चेन्नईनं आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरुवात पराभवानं केली आहे. या पराभवासोबत धोनीला आणखी एक धक्का बसला आहे. षटकांची गती मंद राखल्यामुळे आयपीएलद्वारे धोनीला दंड ठोठावण्यात आला आहे. 

 शनिवारी वानखेडे येथे झालेल्या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे चेन्नईचा कर्णधार धोनी याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईचा संघ षटकांची गती राखण्यात अपयशी ठरल्याचं दिसल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्यांदाच ही चूक झाल्यामुळे कर्णधार धोनीला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

ऋषभ पंतच्या दिल्लीने शनिवार आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नई संघाचा सहज पराभव केला. आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईच्या सुरेश रैनानं तुफानी फटकेबाजी करत ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. रैनाच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर चेन्नईनं निर्धारित २० षटकांत १८८ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्त्युत्तरदाखल दिल्लीनं शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सात विकेटनं सामना जिंकला. 


​ ​

संबंधित बातम्या