IPL 2021 : कमबॅकसाठी गावसकरांनी MS धोनीसह CSK ला दिला खास मंत्र

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 11 April 2021

कूल कॅप्टन धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला संघाला पहिल्या सामन्यात 7 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सुनील गावसरकर यांनी चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनीला एक खास सल्ला दिलाय. 
 

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी धोनीच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फंलदाजीला आल्याचे पाहायला मिळाले. कूल कॅप्टन धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला संघाला पहिल्या सामन्यात 7 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सुनील गावसरकर यांनी चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनीला एक खास सल्ला दिलाय. 

आयपीएलच्या 14 व्या हंगामात चेन्नईच्या ताफ्यात  असणाऱ्या युवा खेळाडूंना धोनीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यामुळे बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याने थोडे लवकर येण्याचा बदल गेम प्लॅनमध्ये असायला हवा, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात एमएस धोनीला खातेही उघडता आले नव्हते. अवघे दोन चेंडू खेळून आवेश खानच्या गोलंदाजीवर धोनी बोल्ड झाला होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा आणि अंबाती रायडू यांच्यानंतर फलंदाजीा आला, याचे आश्चर्य वाटले, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.  

पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील शेवटच्या गड्यापर्यंत चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता होती. सॅम कुरेन याने मर्यादित षटकाच्या सामन्यात फटेबाजी करण्याची आपल्यातील ताकद दाखवून दिलीये. तो आठव्या स्थानाव खेळला. मोईन अलीला तिसऱ्या स्थानावर पाठवण्यात आले. यापूर्वी रायडू या स्थानावर खेळताना पाहायला मिळाले तो पाचव्या क्रमांकावर खेळला. सुरेश रैनाने दमदार कमबॅक करत 54 धावांची खेळी केली. ड्वेन ब्रावो आणि शार्दुल ठाकूर यांच्यातही फटकेबाजी करण्याचा क्षमता आहे. एवढी तगडी बॅटिंग लाईनअप असताना चेन्नईच्या संघाला पहिल्या सामन्यात 6 बाद 188 धावांपर्यंत मजल मारता आली. तोकड्या टार्गेटनंतर चेन्नई संघाचे गोलंदाज पृथ्वी शॉ आणि शिखर धवनला रोखण्यात अपयशी ठरले.  

सामन्यानंतर पंत काय म्हणाला?

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये गावसकर म्हणाले की,  पहिल्या सामन्यातील चूका सुधारून एमएस धोनीने बॅटिंग ऑर्डरसंदर्भात विचार करायला हवा. धोनी लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करायला येतो. केवळ 4-5 षटके बॅटिंग करायची आहे, असाच काहीसा विचार तो करतोय, असे वाटते. पण त्याने 5 किंवा 6  क्रमांकावर बॅटिंगला येऊन युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सीएसकेच्या ताफ्यात अनेक युवा खेळाडू आहेत. सॅम कुरेनच्या पाठीशी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असणाऱ्या युवा खेळाडूकडून 3 किंवा 4 क्रमांकाला संधी देण्याचा विचारही धोनी करत असावा, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या