IPL 2021: MI कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो; 'लालची' बना! (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

यंदाच्या हंगामातही विजयी रुबाब कायम ठेवून षटकार खेचण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरेल.  

टीम इंडियाने विश्वविजेत्या इंग्लंडला एकहाती पराभूत करुन त्यांची हवा काढली. त्यानंतर आता आयपीएलचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. 9 एप्रिलपासून लोकप्रिय आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इंग्लंड संघाविरुद्ध एकत्र खेळलेले रोहित आणि विराट यांच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सने मागील वर्षी युएईच्या मैदानात पाचव्यांदा जेतेपद मिळवून आपलाच सर्वाधिक जेतेपदाचा विक्रम आणखी सुधारला होता. यंदाच्या हंगामातही विजयी रुबाब कायम ठेवून षटकार खेचण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरेल.  

स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या आगामी हंगामाच्या अनुषंगाने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. यात रोहित शर्मा कपासाठी लालची बना, असे म्हणताना दिसते. व्हिडिओमध्ये एका टेबलवर पाच चहाचे कप दिसत आहेत. याकडे पाहत रोहित शर्मा आयपीएल ट्रॉफी मिळवण्यासाठी लालचीपणाशी दोस्ती करा, असे भाष्य करताना दिसते. लालचशी दोस्ती करुन विजयाची भूक वाढवण्याचा मंत्र जपा, असे रोहित या व्हिडिओत म्हटला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसते.

धोनीसोबत लढवय्या सॅम कुरेनचा फोटो का होतोय व्हायरल?

आयपीएलच्या मागील हंगामातील सर्व सामने युएईचे मैदानात रंगले होते. या स्पर्धेत मुंबईने पाचव्यांदा ट्रॉफी पटकावली होती. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले होते. यंदाच्या हंगामात सलग तिसऱ्यांदा आणि विक्रमी सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरेल. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेची पुण्यात सांगता झाल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन रोहित शर्मा जॉइन झाल्याची माहिती देण्यात आली आहेय  

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रोहितने 13 डावात कुटल्या 526 धावा

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माने दमदार कामगिरी केली आहे. कसोटी, टी-20 आणि वनडेतील 13 डावात त्याने 526 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात केली. यातील एका सामन्यात त्याने 50 + आणि एका सामन्यात 100+ धावांची भागीदारी केली. त्याची ही कामगिरी आगामी आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्ससाठी खूप मोलाची अशीच आहे.   रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या