IPL 2021 : ...म्हणून मुंबई इंडियन्सने मलिंगाला रिलीज केलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

लसिथ मलिंगा हा 2008 च्या हंगामापासून मुंबई इंडियन्सचा सदस्य राहिला आहे. काही सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची धूराही सांभाळली आहे.

Lasith Malinga Retires From Franchise Cricket : जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांपैकी एक असलेल्या श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वी त्याला रिलीज केल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता क्रिकेट फ्रँचायझींमधून मलिंगाने निवृतीची घोषणा केल्याचे समोर आले आहे. मलिंगाने या महिन्याच्या सुरुवातीलाच फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळणार नसल्याचे मुंबई इंडियन्सला सांगितले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केले नाही.  मुंबई इंडियन्सने त्याच्या निर्णयाचा सन्मान करत 18 सदस्यांना रिटेन करत त्याला रिलीज केले. 

मुंबई इंडियन्सने एका निवदेनाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, रिटेन आणि रिलीज प्रक्रियेचा निर्णय घेण्यापूर्वी मलिंगाने कुटुंबियांसबोत चर्चा करुन फ्रँचायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला. याची माहिती त्याने मुंबई इंडियन्सला दिली. त्यामुळेच त्याला रिटेन केले नाही, असे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले आहे. मुंबई इंडियन्ससोबतच्या 12 वर्षांपूर्वीचा प्रवास आनंददायी होता, असे सांगत त्याने फ्रँचायझीसह चाहत्यांचे आभारही मानले आहेत.  

ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतली टीम इंडिया; खेळाडूंना क्वारंटाईन नियमातून शिथिलता

लसिथ मलिंगा हा 2008 च्या हंगामापासून मुंबई इंडियन्सचा सदस्य राहिला आहे. काही सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची धूराही सांभाळली आहे. 2020 मध्ये युएईमध्ये आयपीएलच्या 13 व्या हंगामातील स्पर्धा पार पडली. कौटुंबिक कारणास्तव त्याने स्पर्धेतून माघार घेतली. पुढील हंगामात तो पुन्हा मैदानात दिसेल असे वाटत होते. मात्र आता तो थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजामध्ये तो टॉपला आहे. त्याने 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या