IPL 2021 : मुंबई इंडियन्सला फिरकीची उणीव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 April 2021

यंदा हॅट्ट्रिकची संधी असेल, असे भव्यदिव्य यश आयपीएलमध्ये अजून कोणत्याही संघाला मिळवता आलेले नाही. या वेळी ९ तारखेला होणाऱ्या सलामीत त्यांचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध होणार आहे.

मुंबई : एकापेक्षा एक सरस फलंदाज आणि तेवढ्याच ताकदीचे वेगवान गोलंदाज, मॅचविनर अष्टपैलू अशी ताकद असलेल्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळाले आहे. यंदा विजेतेपदाचा षटकार मारण्यासाठी ते प्रयत्नशील असतील; परंतु मॅचविनर आणि कसलेल्या फिरकी गोलंदाजाची उणीव त्यांना भासू शकते. गेल्या सलग दोन स्पर्धांमध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळाले आहे. यंदा हॅट्ट्रिकची संधी असेल, असे भव्यदिव्य यश आयपीएलमध्ये अजून कोणत्याही संघाला मिळवता आलेले नाही. या वेळी ९ तारखेला होणाऱ्या सलामीत त्यांचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध होणार आहे.

ताकद
फलंदाजी ही मुंबईची सर्वात मोठी ताकद आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जाणारा रोहित शर्मा आणि क्विन्टॉन डिकॉक हे सलामीवर. गरज भासल्यास ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लीनकडेही तेवढीच क्षमता. सध्याचा स्टार सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक आणि कृणाल पंड्या, किएरॉल पोलार्ड या सर्वांकडे कोणत्याही स्थितीत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता. वेगवान गोलंदाजीत बुम बुम बुमरा, न्यूझीलंडचा स्टार टेंट्र बोल्ड असे विख्यात गोलंदाज आहेत.

IPL मध्ये 7 वर्षानंतर चान्स मिळाल्यावर पुजाराने बदलला स्टान्स

कमकुवत बाजू 

डावखुरा कृणाल पंड्या आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळलेला राहुल चहर हे आंतरराष्ट्रीय गोलंदाज असले, तरी भरवशाचे नाहीत. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कृणाल पंड्याच्या गोलंदाजीची धुलाई झाली होती. मुंबईकडे जयंत यादव हा पर्याय आहे; पण गेल्या स्पर्धेत त्याला दोनच सामने खेळण्याची संधी देण्यात आली. फिरकीतील ही कमकुवत बाजू ओळखून यंदा अनुभवी पियुष चावलाची निवड करण्यात आली. चावलाने आयपीएलमध्ये 156 विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी अजून कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही.

काय करावे लागणार  

संघाचा समतोल साधण्यासाठी पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांना अधूनमधून गोलंदाजीचा भार वाहवा लागणार. फिरकी गोलंदाज अपयशी ठरू लागल्यास या दोघांपैकी एकाला त्याची षटके भरावी लागतील.
 


​ ​

संबंधित बातम्या