IPL 2021 :  MI षटकार मारणार; CSK तळालाच राहणार; दिग्गजाने केली भविष्यवाणी  

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 2 April 2021

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला युएईतील हंगामात प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नव्हते.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी चॅम्पियन कोण होणार? याची भविष्यवाणी ऐकायला मिळण्यास सुरुवात झाली आहे. 9 एप्रिल 2021 पासून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने भारतातील लोकप्रिय स्पर्धेला सुरुवात होईल. आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघच यंदाची स्पर्धा जिंकेल, अशी भविष्यवाणी न्यूझीलंडचे दिग्गज अष्टपैलू स्कॉट स्टायरिस यांनी केली आहे.  

रॉयल चॅलेंजर्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ पहिली ट्रॉफी मिळवण्यासाठी मैदानात उतरतील. 2008 पासून या संघांनी एकदाही चॅम्पियनचा रुबाब मिरवलेला नाही.  राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिल्या हंगामातच जेतेपद पटकावले होते.  कोलकाता नाईट रायडर्सने 2014 आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ 2016 पासून चॅम्पियनच्या लढतीत कुठेतरी मागे पडताना दिसले.

IPL मध्ये 7 वर्षानंतर चान्स मिळाल्यावर पुजाराने बदलला स्टान्स

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला युएईतील हंगामात प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नव्हते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली होती. त्यामुळे मागील हंगामातील ढिसाळ कामगिरी विसरुन ते मैदानात उतरतील.  यंदाच्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी कोण उचलणार यासाठीची लढाई सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंडची माजी ऑलराउंडर स्कॉट स्टायरिस यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पहिली पसंती दिली आहे.

IPL 2021 : सातासमुद्रापलिकडून विराटच्या RCB साठी आली गूड न्यूज (VIDEO)

मागील वर्षी मुंबई इंडियन्सविरुद्ध भिडलेला दिल्ली कॅपिटल्सला त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. याचा अर्थ युएईतील चित्र पुन्हा दिसेल, अशीच भविष्यवाणी त्यांनी केली आहे. तिसऱ्या स्थानावर त्यांनी पंजाब किंग्ज, चौथ्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद, पाचव्या स्थानावरविराट कोहलीचा RCB, सहाव्या स्थानावर राजस्थान रॉयल्स आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि सर्वात तळाला चेन्नईला स्थान दिल्याचे दिसते.  


​ ​

संबंधित बातम्या