IPL 2021 : मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत चिंता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 April 2021

जर लॉकडाऊन झाले तर समोर येणाऱ्या परिस्थितीचा आम्हाला सामना करावा लागणार आहे. पण हतबल होऊन चालणार नाही, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट देशात अधिक प्रभावी होत आहे त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बीसीसीआयसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येता आठ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या टप्यातील सामने वानखेडे स्टेडिअमवर होत आहेत.बीसीसीआय आणि आयपीएल संघ फ्रँचाईसना आता चिंता वाटू लागली आहे. आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, चांगलेच होईल, असा आशावाद आम्ही करत आहोत. सध्याची परिस्थिती कठीण होत चालल्यासारखी आहे. दररोज बाधित होणारी संख्या ऐकणे यापेक्षा आम्ही काहीच करू शकत नाही. जर लॉकडाऊन झाले तर समोर येणाऱ्या परिस्थितीचा आम्हाला सामना करावा लागणार आहे. पण हतबल होऊन चालणार नाही, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

IPL 2021 : MI षटकार मारणार; CSK तळालाच राहणार; दिग्गजाने केली भविष्यवाणी

यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या आठही संघांची शिबिरे सुरू झालेली आहेत. पण मुंबई आणि महाराष्ट्रात सराव करत असलेल्या संघांबाबत चिंता वाटू लागली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाने सर्वप्रथम मुंबईत आपले सराव शिबिर सुरू केलेले आहे. त्यांच्या संघाचे निवास ट्रायड्रेंट हॉटेलमध्ये आहे. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संखेवर त्यांचेही लक्ष आहे.

मुंबईतील परिस्थितीवर आम्ही बारकाईने अवलोकन करत आहोत. बीसीसीआय आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही सरावही करत आहोत परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही नाही त्यामुळे हतबल होण्याचे कारण नाही. नित्यनियमाने आमचे खेळाडू सराव करत आहेत. पण लॉकडाऊन झाला तर पुढची परिस्थिती आमच्या हाती नसेल, असे चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितले. आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरवात होत असून वानखेडेवरचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी चेन्नई आणि दिल्ली कॅपीटल या संघात होणार आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या