चिअरगर्ल्सविना रंगणाऱ्या सामन्यात ब्रावोचे ठुमके; व्हिडिओ व्हायरल 

सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 17 April 2021

चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंच्या कामगिरीशिवाय सध्या सोशल मीडियावर आणखी एक चर्चा रंगतेय ती म्हणजे ड्वेन ब्रोच्या (Dwayne Bravo) मैदानातील डान्सची.

Punjab vs Chennai, 8th Match : पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात वानखेडेच्या मैदानात (Wankhede Stadium, Mumbai ) आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) आठवा सामना रंगला होता. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली या सामन्यात चेन्नईने विजयाचा शुभारंभ केला. दीपक चाहरचा (Deepak Chahar) भेदक मारा, रविंद्र जडेजाची जबऱ्या फिल्डिंग आणि प्रमोशन मिळालेल्या मोईन अलीची फटकेबाजी याच्या सुरेख संगमाशिवाय इतर खेळाडूंनीही सर्वोत्तम खेळ दाखवला. 

चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंच्या कामगिरीशिवाय सध्या सोशल मीडियावर आणखी एक चर्चा रंगतेय ती म्हणजे ड्वेन ब्रोच्या (Dwayne Bravo) मैदानातील डान्सची. कॅरेबियन खेळाडू क्रिकेटच्या मैदानात आपल्या हटके अंदाजाने लक्षवेधून घेत असतात. ब्रोनेही असाच काहीसा हटके अंदाज दाखवून देत चाहत्यांचे आणि संघातील सहकाऱ्यांचे मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले. ड्वेन ब्रावोचा डान्स पाहून अंबाती रायडू खळखळून हसतानाही दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण त्याने दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यातील डान्स स्टेप केल्याची चर्चाही करत आहेत. 
 

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून अवघ्या 106 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग सहज करत चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. ब्रावोने या सामन्यात 2 ओव्हर्समध्ये 10 धावा खर्च करुन एक विकेट घेतली.  चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

IPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'

दिपक चाहरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत तगडी बॅटिंग लाईनअप असलेल्या पंजा किंग्जच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले. मयांक अग्रवालला खातेही उघडता आले नाही. गेलही त्याच्यासमोर आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवू शकला नाही. पंजाबचा दिपक वर्सेस चेन्नईचा दिपक लढाईत चेन्नईचा दिपक भारी ठरला. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या निकोलस पूरनलाही चाहरने तंबूत धाडले.  4 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करुन  4 विकेट घेतल्या. 


​ ​

संबंधित बातम्या