किंग्ज इलेव्हन पंजाबचा षटकार; महागड्या मॅक्सवेलसह या खेळाडूंना दिला नारळ

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

सर्वाधिक पैसा मोजून युएईच्या मैदानात संघासाठी महागडा ठरलेल्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लॅन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने नारळ दिलाय.

IPL 2021 Players Retention-released News : युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात लोकेश राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने लक्षवेधी खेळ केला. पण मोक्याच्या क्षणी पराभव झाल्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.

संघाला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मागील वर्षीच्या हंगामातील चुका भरुन काढत नव्या इराद्याने संघ मैदानात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. याच कारण फ्रेंचायजींच्या रिटेन-रिलीज खेळात किंग्ज इलेव्हन पंजाबने एकाच दणक्यात सहा जणांना रिलीज करण्याच निर्णय घेतला आहे.

IPL 2021 : मुंबई इंडियन्सनं यॉर्कर किंग मलिंगाला केलं रिलीज

सर्वाधिक पैसा मोजून युएईच्या मैदानात संघासाठी महागडा ठरलेल्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लॅन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने नारळ दिलाय. मॅक्सवेलनं 13 सामन्यात केवळ 108 धावा केल्या होत्या. गोलंदाजीमध्येही तो फारसा उपयुक्त ठरला नव्हता. किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटोर राहिलेला विरेंद्र सेहवागनेही त्याची फिरकी घेतली होती. अधिक पैसे मोजूनही त्याचा उपयोग होत नाही, अशा आशयाची टिपण्णी सेहवागने केली होती. अखेर त्याला संघाने रिलीज केले आहे. 

IPL 2021 : स्मिथला बाहेरचा रस्ता, 'रॉयल' संजू राजस्थानचा 'कॅप्टन'

मॅक्सवेलशिवाय वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेललाही संघाने बाहेरचा रस्ता दाखवलाय. शेल्डन कॉट्रेलला 6 सामन्यात केवळ 6 विकेट मिळाल्या. त्याने हटके अंदाजातील सेलिब्रेशनने लक्षवेधले असले तरी आपली छाप सोडण्यात तो अपयशी ठरला होता. त्याच्या व्यतिरिक्त कृष्णापा गौतम, मुजीम उर रेहमान, जीमी निशम आणि करुन नायर यांनाही किंग्ज इलेव्हन पंजाब 


​ ​

संबंधित बातम्या