IPL 2021 Points Table : मुंबईच्या पराभवानं चेन्नईचं नुकसान   

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 21 April 2021

चेपॉकच्या मैदानावर मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं मुंबईचा पराभव करत गुणतालिकेत दुसरं स्थान पटाकवलं आहे.

IPL 2021 Points Table : चेपॉकच्या मैदानावर मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं मुंबईचा पराभव करत गुणतालिकेत दुसरं स्थान पटाकवलं आहे. मुंबईच्या पराभवामुळे चेन्नईला गुणतालिकेत दुसरं स्थान गमावावं लागलं आहे. आयपीएलच्या 13 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ 137 धावांपर्यंत पोहचला. अनुभवी अमित मिश्राच्या फिरकीपुढे चेन्नईचा बलाढ्य संघ ढेपाळला. त्यानंतर शिखर धवन आणि स्टिव्ह स्मिथ या अनुभवी फलंदाजाच्या संयम खेळीमुळे दिल्लीनं हा साना सहा गड्यानं जिंकला. यासह गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. 

विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघ अजय असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दिल्ली दुसऱ्या स्थानावर असून चेन्नईचा संघ तिसर्या क्रमांकावर विराजमान आहे. पराभवानंतर मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. 

पाहा गुणतालिका -

IPL Orange Cap : दिल्लीचा सलामी फलंदाज शिखर धवन 231 धावांसह अव्वल स्थानावर असून आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर 16 धावा आहेत. 

IPL Purple Cap : आरसीबीच्या हर्षल पटेल 9 विकेटसह अव्वल स्थानावर आहे. दिल्लीचा आवेश खान 8 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


​ ​

संबंधित बातम्या