'सुपर संडे'नंतर गुणतालिकेत फेरबदल, पाहा कोण अव्वल अन् कोण तळाशी?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

ipl 2021 points table - बंगळुरु आणि दिल्लीच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे. 

IPL 2021 Point Table : आयपीएलच्या 14 व्या हंगामात रविवारी पहिल्यांदाच दोन सामने झाले. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबी संघानं इयान मॉर्गनच्या कोलकाता संघाचा 38 धावांनी पराभव केला. तर मुंबईच्या वानखेडे मैदानावर रात्री झालेल्या सामन्यात दिल्लीनं पंजाबला सहा गड्यांनी धूळ चारली. दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पडला. आरसीबीनं 205 धावांचा डोंगर उभा केला होता. तर दिल्लीनं 18 षटकांत 198 धावांचा पाऊस पाडला. दोन्ही सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे. 

विराट कोहलीचा आरसीबी हा एकमेव अजय संघ आहे. आरसीबीनं तिन्ही सामन्यात विजय संपादन करत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटाकवलं आहे. तर दिल्ली आणि मुंबईच्या खात्यात प्रत्येकी चार - चार गुण आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्ली दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीचा चेन्नई संघ चौथ्या स्थानावर विराजमान असून राहुलचा पंजाब पराभवानंतर सातव्या स्थानावर घसरला. हैदराबाद संघाला अद्याप खातं उघडता आलं नसून ते गुणतालिकेत तळाशी आहेत. 

पाहा गुणतालिका -

ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर?
दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) शिखर धवनने (Shikhar Dhawan) 3 सामन्यात 186 धावा ठोकल्या आहेत. शिखर धवनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या आरसबीच्या हर्षल पेटल यानं पर्पल कॅपवर आपलं नाव कोरलं आहे. हर्षल यानं तीन सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या