IPL 2021 : पंजाब किंग्जमध्ये बदलाची हवा; आता जर्सी-हेल्मेटची चर्चा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 31 March 2021

लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील संघ नव्या जर्सीत मैदानात उतरेल.  जर्सीचा रंग पूर्वीप्रमाणे लाल असला तरी जर्सीच्या बॉर्डमध्ये गोल्डन पट्टी दिसणार आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी पंजाबच्या संघाने अनेक बदलासह संघ बांधणी केली आहे. संघाची धूरा लोकेश राहुलकडे दिल्यानंतर जुन्या नावात बदल करुन संघ मैदानात उतरणार आहे. पंजाब किंग्ज (पूर्वीचे नाव किंग्ज इलेव्हन पंजाब) ने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन आणखी एका बदलाची माहिती दिली आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील संघ नव्या जर्सीत मैदानात उतरेल.  जर्सीचा रंग पूर्वीप्रमाणे लाल असला तरी जर्सीच्या बॉर्डमध्ये गोल्डन पट्टी दिसणार आहे.

जर्सीच्या लोगोवरील मुख्य स्पॉन्सरच्या नावाच्या खाली सिंहाचे प्रतिक असणारे चिन्ह देखील पहायला मिळते. पंजाब किंग्ज यंदाच्या हंगामात सोनेरी रंगाचे हेल्मट वापरणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचा पहिला सामना 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. वानखडेच्या मैदानात विजयी सलामी देण्याच्या इराद्याने पंजाबचा संघ मैदानात उतरेल. मागील हंगामात संघाने दमदार कामगिरी केली. पण मोक्याच्या क्षणी गमावलेल्या मॅचेसमुळे त्यांना मोठा फटका बसला. प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होण्याची नामुष्की संघावर ओढावली होती. संघाने नावात केलेला बदल, जर्सीतील नवा लूक, आणि नवे हेल्मेट पंजाबला चॅम्पियन बनवण्यात लक फॅक्टर ठरतील का ? हे पहावे लागेल. 

IPL 2021 : पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाचे ओझे

युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या होत्या. मात्र संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. गतवर्षीप्रमाणे यावर्षी दमदार कामगिरी करुन संघाचा प्रवास सुवर्णमयी करण्याचे इरादे घेऊन लोकेश राहुल मैदानात उतरेल. नावातील बदल आणि नवा लूकमध्ये संघ स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करण्यास यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  


​ ​

संबंधित बातम्या