IPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 16 April 2021

दिपक हुड्डालाही त्याने एवढ्याच धावांवर तंबूत धाडले. तर निकोलस पुरनला त्याने खातेही उघडू दिले नाही. 

IPL 2021 Punjab Kings vs Chennai Super Kings :  पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिपक चाहरने (Deepak Chahar) कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत तगडी बॅटिंग लाईनअप असलेल्या पंजाबच्या फलंदाजीला सुरुंग लावला. दिपक चाहरने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर मंयाक अग्रवालला शून्यावर बाद केले. स्फोटक आणि मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या गेलचा खेळ त्याने 10 धावांवर खल्लास केला. दिपक हुड्डालाही त्याने एवढ्याच धावांवर तंबूत धाडले. तर निकोलस पुरनला त्याने खातेही उघडू दिले नाही. 

स्ट्रायकर बॉलरने चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर धोनीने त्याला कंट्युन्यू करत चार षटकांचा कोटा संपवला. त्याने या चार षटकात 13 धावा खर्च करुन पंजाबच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याचे काम केले. आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील दिपकची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 50 सामन्यात त्याने 49 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबची अवस्था बिकट झाली. पहिल्या 6.2 षटकात पंजाब किंग्जचा अर्धा संघ अवघ्या 26 धावांत तंबूत परतला.  

BCCIच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नटराजन का नाही; जाणून घ्या कारण​

धोनीची कमालीची कॅप्टन्सी

आपल्या प्रमुख गोलंदाजाची सर्व षटके सलग संपवण्याचा निर्णय सहसा कोणताही कर्णधार घेत नाही. पण गोलंदाज लयीत असल्याचे लक्षात घेऊन धोनीने पुन्हा एकदा आपल्या धाडसी निर्णयाची झलक दाखवून दिली. फिल्डिंगमध्ये रविंद्र जडेजाने कमालीची कामगिरी करुन लक्षवेधले. त्याने केएल राहुलला धावबाद केले तर क्रिस गेलचा अप्रतिम झेल टिपला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाने स्पर्धेला सुरुवात करणाऱ्या चेन्नईचा संघाने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त सुरुवात केली.


​ ​

संबंधित बातम्या