IPL 2021 : क्वारंटाईन रुममध्ये प्रॅक्टिस; राहुल तेवितयाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 2 April 2021

राजस्थान रॉयल्सचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलमधील खेळाडूंच्या रुममध्ये कॅमेरे सेट करण्यात आले आहेत.  तेवतिया कॅमरा ऑफ करायला विसरला आणि त्याच्या मजेशीर हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.  

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या हंगामाची फ्रेंचायझी संघानी जोरदार तयारी सुरु केली आहे. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत लक्षवेधी ठरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलमधील खेळाडूंच्या रुममध्ये कॅमेरे सेट करण्यात आले आहेत.  तेवतिया कॅमरा ऑफ करायला विसरला आणि त्याच्या मजेशीर हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.  

टीम जॉईन केल्यानंतर राहुल तेवतिया सध्या क्वारंटाईन झालाय. त्यामुळे त्याला हॉटेलमधील एका खोलीतच थांबावे लागत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तेवतिया पहिल्यांदा कोणालातरी कॉल करताना दिसतो. त्यानंतर तो कसरत करायला सुरुवात करताना दिसते. त्याच ठिकाणी तो लगेच बॅटिंगची प्रॅक्टिसही करायला सुरुवात करतो. आपल्याला कोणी पाहतच नाही, अशा अविर्भावात राहुल आहे, या कॅप्शनसह राजस्थान रॉयल्सने राहुल तेवतियाचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक क्रिकेट चाहते प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये राहुल तेवतियाने आतापर्यंत 34 सामने खेळले आहेत. यात त्याने 366 धावा केल्या आहेत. तर 24 विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत. मागील हंगामात तेवतियाने लक्षवेधी खेळी केली होती.  14 सामन्यात त्याने 42.50 च्या सरासरीने 255 धावा ठोकल्या आहेत. यासोबतच त्याने 10 विकेटही घेतल्या होत्या. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असल्याची त्याने दाखवून दिले असून राजस्थान रॉयल्सला यंदाच्या हंगामात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीमुळेच 27 वर्षीय राहुल तेवतियाला इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले होते. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.  

नटराजनची सुंदर ड्राइव्ह; आनंद महिंद्रांना दिलं खास रिटर्न गिफ्ट

राजस्थान रॉयल्स संघ - संजू सॅमसन (कर्णधार), आकाश सिंह, एंड्रयू टाय, अनुज रावत, बेन स्टोक्स, चेतन सकारिया, क्रिस मॉरिस, डेविड मिलर, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, कार्तिक त्यागी, केसी करियप्पा, कुलदीप यादव, लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडेय, मुस्ताफिजुर रहमान, राहुल तेवतिया, रियान पराग, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, यशस्वी जायसवाल.


​ ​

संबंधित बातम्या