IPL 2021 : 16.25 कोटींचा गडी पंजाबसाठी डोकेदुखी ठरणार?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 12 April 2021

मुंबईच्या मैदानात रंगणाऱ्या  राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील सामन्यात  क्रिस मॉरिस राजस्थान रॉयल्सचे ट्रम्प कार्ड असेल.

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज आणि संजू सॅमसन कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलच्या 14 व्या हंगामातील चौथा सामना होणार आहे. पंजाब आणि राजस्थान यंदा पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. या सामन्यात षटकार-चौकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते. राजस्थानकडून बेन स्टोक्स, जोस बटलर तर पंजाबकडून राहुल, गेल यांच्यासराखे तुफान फटकेबाजी करणारे खेळाडू दमदार खेळीनं मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी उत्सुक असतील. याशिवाय 16.25 कोटींचा आयपीएलच्या इतिहासातील महागड्या खेळाडूवरही सर्वांच्या नजरा असतील. 

द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

मुंबईच्या मैदानात रंगणाऱ्या  राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील सामन्यात  क्रिस मॉरिस राजस्थान रॉयल्सचे ट्रम्प कार्ड असेल. दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज असलेल्या जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत मॉरिसवर मोठी जबाबदारी असेल. पंजाब किंग्जच्या ताफ्यात पावर-पॅक बॅटिंग ऑर्डर आहे. त्यांना रोखण्यासाठी मॉरिस कितपत उपयुक्त ठरतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात परदेशी गोलंदाजांची उणीव आहे. मागील हंगामात आर्चरला कोणाचीही साथ मिळाली नव्हती.  केवळ फिरकीपटूंनी बऱ्यापैकी कामगिरी केली होती. यावेळी मॉरिस आणि मुस्ताफिजुर रहमान यांच्यातील ताळमेळावर राजस्थानची बरीचशी गणिते अवलंबून असतील.  

हॉट मॉडेलच्या गराड्यात गेल; व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

मुस्ताफिजुर रहमान याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही हे देखील पाहावे लागेल. पहिल्या सामन्यात जोस बटलर, ऑल-राउंडर बेन स्टोक्स आणि मॉरिस यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. रेहमानला खेळवण्यासाठी राजस्थानला खूप विचार करावा लागणार आहे. लियाम लिविंगस्टोन आणि डेविड मिलर यांना अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. 


​ ​

संबंधित बातम्या