राजस्‍थानला धक्का, स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची IPL मधून माघार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 21 April 2021

IPL 2021 :स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची माघार

IPL 2021 : युवा संजू सॅमसन (Sanju Samson) च्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला बेन स्‍टोक्‍स आयपीएलला मुकणार असल्यानं धक्का बसला होता. त्यातच भर म्हणून इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूनं आयपीएलमधून माघार घेतली आहे.  दुखापतीमुळे बेन स्टोक्स आयपीएलला मुकणार आहे. आता त्याचा सहकारी लियाम लिविंगस्टोन यानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे.  बायो बबलमध्ये थकावट येत असल्यामुळे लियामने हा निर्णय घेतला आहे.  

लियाम लिविंगस्टोन गेल्या वर्षभरापासून बायो बबलमध्ये राहत आहे. यामध्ये त्याला आता थकावट येत असल्यामुळे मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री उशीरा तो मायदेशासाठी रवाना झाला. राजस्थान रॉयल्सनं लिविंगस्टोन मायदेशी गेला असून आयपीएलमधून माघार घेतल्याचं ट्विट केलं आहे. तसेच लिविंगस्टोनच्या निर्णयाचं राजस्थान संघानं समर्थन केलं आहे.  

राजस्‍थानने ट्विट करत म्हटलेय की,  लिविंगस्टोन सोमवार रात्री उशीरा मायदेशी परतला आहे. क्रिकेटमुळे गेल्यावर्षभरापासून तो बायो बबलमध्ये असल्यामुळे थकावट जाणवत होती. त्यामुळे मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय. 


​ ​

संबंधित बातम्या