IPL 2021 : पैसा मिळाला आणि आता इज्जतही; मॉरिसच्या खेळीवर सेहवाग झाला फिदा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 16 April 2021

आयपीएलच्या लिलावात क्रिस मॉरिससाठी राजस्थानने 16.25 कोटी मोजले होते. हे पैसे वाया जाणार नाहीत, अशीच खेळी मॉरिसने केली.   

Indian Premier League 2021, Rajasthan Royals vs Delhi Capitals, 7th Match: आयपीएलच्या 14 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ला 3 विकेट्सनी पराभूत करुन पहिला विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ठरलेल्या क्रिस मॉरिसने (Chris Morris) तुफानी खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. दिल्ली कॅपिटल्सने चेस करणाऱ्या राजस्थानला पराभवाच्या उंबरठ्यापर्यंत नेले होते. पण क्रिस मॉरिसने जबरदस्त  फटकेबाजी करत दिल्लीच्या हातून सामना हिसकावून घेतला.

विराट, रोहित, बुमराहला वर्षाला सात कोटी रुपये; हार्दिक, पंत पाच कोटींचे मानकरी

मॉरिसने आपल्या तुफानी खेळीने संघ आपल्यावर विश्वास ठेवू शकतो, हे दाखवून दिले. आयपीएलच्या लिलावात क्रिस मॉरिससाठी राजस्थानने 16.25 कोटी मोजले होते. हे पैसे वाया जाणार नाहीत, अशीच खेळी मॉरिसने केली.   
मॉरिसच्या दमदार इनिंगनंतर अनेकांना पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने निर्णायक क्षणी सिंगल टाळल्याचा क्षण आठवला असेल. नॉन स्ट्राईकवर असलेल्या मॉरिसला स्ट्राईक देणं संजूनं टाळल होते. त्याच मॉरिसने आपण सामन्याला कलाटणी देऊ शकतो हे दाखवू दिले. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीनंतर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात संजू बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात मॉरिसने आपणही तुफान फटकेबाजी करु शकतो, याची झलक दाखवली. 

DC vs RR: परागची चपळाई; पंतच्या खेळीला लावला ब्रेक (VIDEO)

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर एक खास ट्विट केले आहे. यात त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यातील क्रिस मॉरिसचा फोटो आणि दिल्ली विरुद्धच्या सामन्यातील त्याचा रुबाब दाखवणारे फोटो शेअर केले आहते. पंजाब विरुद्धच्या फोटोचा वर्णन करताना सेहवागने लिहिलंय की पैसा मिळाला पण इज्जत नाही.  दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मॉरिसने  पैसा आणि इज्जत दोन्हीचा संगम साधला, अशा आशयाचे ट्विट सेहवागने केले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात क्रिस मॉरिसने 72 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे 589 धावा आहेत. त्याच्या नावे 2 अर्धशतकांची नोंद असून 83 विकेट त्याच्या खात्यात जमा आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या