IPL 2021: जडेजा फिट है बॉस!

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 4 April 2021

रविंद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर त्याला ही दुखापत झाली होती.

आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) च्या ताफ्यासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी  एक चांगली बातमी आहे. 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजा खेळणार असल्याचे समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील सिडनी कसोटी सामन्यात  रविंद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर त्याला ही दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतर आता जेडेजा फिट झाला असून तो स्पर्धेतील चेन्नईच्या पहिल्या सामन्यात संघाचा भाग असेल. शस्त्रक्रियेनंतर रविंद्र जडेजा  बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत निरीक्षणाखाली होता. रिहॅबिलिटेशन प्रोगाम पूर्ण करुन तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सहभागी झाला आहे.  

टाइम्स ऑफ इंडियाने सीएसके टीम मॅनेजमेंटच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, जडेजाने नेटमध्ये गोलंदाजीसोबतच फलंदाजीही केली आहे. त्यामुळे दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तो प्लेईंग इलेव्हनमधील प्रमुख खेळाडू असेल, असे संकेत मिळतात. जर त्याला संधी मिळाली तर जवळपास चार महिन्यानंतर तो मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियातील दुखापतीमुळे घरच्या मैदानातील इंग्लंड दौऱ्याला त्याला मुकावे लागले होते. त्याच्या जागेवर अक्षर पटेलला संघात स्थान मिळाले होते. त्याने संधीच सोन करुन दाखवल्याचेही पाहायला मिळाले होते.  

IPL 2021: अली म्हणाला; नो अल्कोहोल लोगो; CSK लगेच झाले 'राजी'

ऋतूराज चेन्नईच्या डावाची सुरुवात करु शकेल 

युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात लक्षवेधी खेळी करणाऱ्या ऋतूराज यंदाच्या हंगामात चेन्नई संघाच्या डावाची सुरुवात करु शकतो. शेन वॉटसन यंदाच्या हंगामात नाही. त्यामुळे ऋतूराजला ओपनिंगची संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युएईमध्ये रंगलेल्या स्पर्धेवेळी कोरोनातून सावरत ऋतूराजने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सलग तीन अर्धशतके लगावली होती.  

दुसरीकडे भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने देखील मागील हंगामात चांगली कामगिरी केली हतोी. 14 सामन्यात 46 पेक्षा अधिक सरासरीने 232 धावा केल्या होत्या. त्याचा स्टाइक रेट 171 पेक्षाही अधिक होता. त्याने 6 विकेटही घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील त्याची कामगिरी कमालीची होती. त्याच्या संघात येण्यामुळे चेन्नईला नक्कीच मोठा दिलासा मिळाला असेल. 


​ ​

संबंधित बातम्या