CSK vs DC : जडेजाने कॉ़ल करुन रैनाला रन आउट केलं, पाहा नेमकं काय झालं (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 10 April 2021

पण या गोष्टीला खूप उशीर झाला होता. सुरेश रैना अर्ध्या रस्त्यात आला होता. येथूम माघारी फिरणे त्याच्यासाठी कठिण होते. रैना जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता.

एका वर्षानंतर आयपीएलच्या मैदानात उतरलेल्या सुरेश रैनाने अर्धशतकी खेळी करून दमदार कमबॅक केले. चेन्नईचा संघ अडचणीत असताना त्याने मैदानात नुसता तग धरला नाही तर तुफान फटकेबाजी करत संघाच्या डावाला आकार दिला. 16 व्या षटकात रविंद्र जडेजा आणि रैना यांच्यातील ताळमेळ ढासळला. जडेजाने दोन धावांसाठी रैनाला कॉल केला. दुसऱ्या धाव घेत असताना गोलंदाजी करणारा आवेश खान जडेजाच्या रस्त्यात आला. त्यामुळे त्याने दुसरी धाव घेण्यास नकार दिला.  

पण या गोष्टीला खूप उशीर झाला होता. सुरेश रैना अर्ध्या रस्त्यात आला होता. येथूम माघारी फिरणे त्याच्यासाठी कठिण होते. रैना जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. पण त्याची विकेट वाचवण्यासाठी जडेजाने विके फेकण्याचा वैगेरे अजिबात विचार केला नाही. रैनाने 36 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. तो आणखी काही काळ मैदानात थांबला असता तर कदाचित चेन्नईच्या संघाने 200 पर्यंत मजल मारली असती. तो बाद झाल्यानंतर सॅम कुरेनच्या साथीने जडेजाने अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या डाव 188 धावांपर्यंत पोहचवला. 

 

CSKvsDC : गब्बरचा जबरदस्त कॅच; ऋतूराजला स्वस्तात धाडलं तंबूत (VIDEO)​

युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत आयत्या वेळी रैनाने स्पर्धेतून माघार घेतली होती. आयपीएलच्या इतिहासात रैना पहिल्यांदा खेळताना दिसला नाही. त्याच्या निर्णयानंतर चेन्नई संघ व्यवस्थापनासह क्रिकेट वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. त्याला चेन्नईच्या संघात पुन्हा संधी मिळणार का? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. अखेर धोनी आणि टीम मॅनेजमेंटने आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैनाला रिटेन केले. त्याने दमदार अर्धशतक करुन संघासाठी उपयुक्त खेळी करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहे. त्याला आता अन्य सहकारी कशी साथ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 


​ ​

संबंधित बातम्या