IPL 2021 : मॅक्सवेलसाठी कायपण! विराटनं सांगितला खास किस्सा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 9 April 2021

. मॅक्सवेल एक सर्वोत्तम खेळाडू आहे. मागील वर्षी देखील आम्ही त्याला आमच्या संघात घेण्याचे प्रयत्न केले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आयपीएलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रेन मॅक्सवेल याच्यासाठी 14.25 कोटी मोजले. किंग्ज इलेव्हन पंजाब (किंग्ज पंजाब) संघाकडून सपशेल अपयशी ठरलेल्या मॅक्सवेलवर त्यांनी एवढी मोठी रक्कम खर्च करण्यामागचा विराट प्लॅनच RCB ने आखला होता. मुंबई इंडियन्स  विरुद्धच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यापूर्वी किंग कोहलीने यासंदर्भात भाष्य केले आहे. मॅक्सवेलमध्ये एक अनोखी ऊर्जा असल्याचे मत विराट कोहलीने मांडले आहे.    

आरसीबीने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केलाय. मॅक्सवेल एक सर्वोत्तम खेळाडू आहे. मागील वर्षी देखील आम्ही त्याला आमच्या संघात घेण्याचे प्रयत्न केले होते. आरसीबीच्या ताफ्यात आल्यानंतर त्याचा उत्साह आणखी वाढलाय. फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात त्याला संघात सामावून घेण्यावर विशेष भर दिल्याचेही विराट कोहलीने या व्हिडिओत म्हटले आहे.  कोहलीने ऑस्ट्रेलियन फिरकीपटू एडम झम्पा याच्यावरही कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.  

धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फारसी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या हंगामात संघात सामील करुन घेतलेल्या मॅक्सवेलकडून संघाला खूप आशा आहेत. तो किंमतीप्रमाणे हिंमती खेळी दाखवून संघासाठी खऱ्या अर्थाने मौल्यवान खेळाडू म्हणून नावारुपाला येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यंदाच्या हंगामातील एकाही संघाला त्याच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. त्यामुळे स्पर्धेतील चॅलेंजही अधिक असणार आहे, असे विराट कोहलीने म्हटले आहे. विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्ध संघाच्या डावाला सुरुवात करु शकतो. अष्टपैलू मॅक्सवेलचा तो कसा वापर करुन घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मॅक्सवेलसह एबी डिव्हिलियर्स हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील हुकमी एक्का आहे. त्यामुळे विराट, एबी आणि मॅक्सी या त्रिकूटावर संघाची मदार असेल.


​ ​

संबंधित बातम्या