कोहलीचा अजब योगायोग! पहिल्या दोन्ही सामन्यात सगळ काही सेम-टू-सेम

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 April 2021

IPL 2021 : विराट कोहलीच्या आरसीबीनं इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या १४ व्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली आहे.

IPL 2021 : विराट कोहलीच्या आरसीबीनं इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या १४ व्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली आहे. आरसीबीनं पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई आणि दुसऱ्या सामन्यात हैदराबाद संघाचा पराभव केला. यासह विराटचा आरसीबीनं संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. दोन्ही सामन्यानंतर विराट कोहलीबाबत एक अजब योगायोग समोर आला आहे. यंदाच्या हंगामीतल दोन्ही सामन्यात विराट कोहलीनं काढलेल्या धावा, खेळलेले चेंडू आणि लगावले चौकार सर्वकाही सेम आहे. 

विराट कोहलीनं मुंबई आणि हैदराबादबरोबर प्रत्येकी ३३ धावांची खेळी केली. या खेळासाठी त्यानं दोन्ही सामन्यात २९ चेंडूचा सामना केला. या खेळीदरम्यान त्यानं प्रत्येकी ४ चौकार लगावले आहेत. विराट कोहलीच्या पहिल्या दोन्ही डावातील खेळी एकसारख्याच होत्या. इतकेच नव्हे... दोन्ही सामन्यात विराट कोहली १३ व्या षटकात बाद झाला. विराट कोहलीच्या या आकडेवारीची सोशल मीडीयावर चर्चा सुरु आहे.  विराट कोहलीच्या आरसीबी संघाबाबतचीही एक आकडेवारी सध्या चर्चेत आहे. २०१४ आणि २०२१ मध्ये विराट कोहलीनं पहिले दोन्ही सामने जिंकले होते. 
 

कोहली संतापला; डग आउटमध्ये खुर्चीवर काढला राग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा कर्णधार विराट कोहली मैदानात स्थिरावला. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही त्याला मोठी खेळी करता आली नाही. सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात कोहली 33 धावा करुन बाद झाला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर विजय शंकरच्या हाती झेल देऊन कोहली माघारी फिरला. 33 धावा करण्यासाठी कोहलीने 29 चेंडू खेळले. यात त्याने 4 चौकार लगावले. विजय शंकरने त्याचा एक सुरेख झेल टिपला. बाद झाल्यानंतर विराट स्वत:वरच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. मैदानातून बाहेर जाताना कोहलीने बाउंड्री लाईनवर रागाने बॅट आदळली. एवढेच नाही तर डग आउटमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर त्याने जोरात बॅट आदळून राग व्यक्त केला.


​ ​

संबंधित बातम्या