IPL 2021 : रसेलनं जाणूनबुजून धावबाद नाही केलं? पाहा Video

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

गोलंदाजी करताना जाणूनबुजून रसेलनं धावबाद केलं नाही. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. 

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पहिल्यांदाच धावांचा पाऊस पडला. रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा डोंगर उभारला. धावांचा पाठलाग करताना कोलकातानं 166 पर्यंत मजल मारली. धावांचा पाऊस पडणाऱ्या या सामन्यात एक धक्कादायक प्रसंग घडला. गोलंदाजी करताना जाणूनबुजून रसेलनं धावबाद केलं नाही. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. 

अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर डिव्हिलिअर्सनं स्ट्रेट ड्राईव्ह मारला. मात्र, चेंडू गोलंदाजी करत असलेल्या रसेलच्या हातात गेला. मात्र, तोपर्यंत नॉन स्ट्राइकला असलेल्या कायले जेमिसन यानं अर्धी खेळपट्टी ओलांडली होती. तरीही रसेलने जेमिसनला धावबाद करण्याचा प्रयत्न केला नाही. यावरुन नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रश्नांचा भडीमार केलाय. 

पाहा व्हिडिओ -

आरसीबीनं लागोपाठ तिसऱ्या सामन्यात विजय संपादन करत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केलं आहे. कोलकाताकडून रसेल सर्वात महागडा गोलंदाज ठरला. रसेलनं दोन षटकांत 38 धावा खर्च केल्या.    


​ ​

संबंधित बातम्या