DC vs RR: परागची चपळाई; पंतच्या खेळीला लावला ब्रेक (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 15 April 2021

रियान परागने स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवून देत पंतला तंबूत धाडण्यात मोलाची कामगिरी बजावली.

IPL 2021 Rajasthan vs Delhi, 7th Match : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपशेल निराश केले.  पृथ्वी शॉ 2 (5) आणि शिखर धवन 9 (11) धावांवर तंबूत परतल्यानंतर अजिंक्य रहाणेही 8 (8) स्वस्तात माघारी फिरला. 3 बाद 36 धावा असताना कर्णधार पंतने दबावात आपल्या शैलीतील खेळीनं संघाला सावरले. त्याने 32 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. एका बाजूने विकेट पडत असताना तो निर्भिडपणे फटकेबाजी करत होता. 

रियान परागने स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवून देत पंतला तंबूत धाडण्यात मोलाची कामगिरी बजावली. 13 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पंत धावबाद झाला. तत्पूर्वी त्याने बिकट परिस्थितीतून संघाला सावरले होते. तो मोठी खेळी करुन संघाला संकटातून बाहेर काढेल असे दिसत असताना रियान परागने त्याचा खेळ खल्लास केला.  

 

कोहलीचा अजब योगायोग! पहिल्या दोन्ही सामन्यात सगळ काही सेम-टू-सेम

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पंतने 30 चेंडूत आयपीएलमधील 13 वे अर्धशतक झळकावले. राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंतने यापूर्वीही धमाकेदार कामगिरी केली आहे. आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत त्याने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंतचे चौथे अर्धशतक आहे. यापूर्वी राजस्थानविरुद्ध त्याने  20, 69, नाबाद 78, नाबाद 53, 5 धावांची खेळी केली होती. रिषभ पंतने आयपीएलमध्ये 70 सामन्यात 2145 धावा केल्या आहेत. यात 1 षतक आणि 13 अर्धशतकाचा समावेश आहे. विकेटमागे त्याने 46 कॅच पकडले असून 11 गड्यांना त्याने स्टम्पिंग केले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या