रोहितसह मुंबईच्या खेळाडूंनी मराठी गाण्यावर धरला ठेका; पाहा व्हिडिओ 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

IPL 2021: आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.

IPL 2021 : मुंबई - आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच मुंबई इंडियन्स संघातील महत्वाच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्यासह मुंबई संघातील खेळाडूंनी कोळीगितावर ठेका धरला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पाच वेळा चषकांवर नाव कोरणाऱ्या मुंबईचा सामना विराट कोहलीच्या आरसीबीबरोबर ९ तारखेला होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा डान्स करताना दिसला आहे. रोहितसह क्रृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि सुर्यकुमार यादव दिसत आहे. यांच्या डान्सचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे. 'एक नारळ दिलाय' या कोळी गितावर मुंबईच्या खेळाडूंनी ठेका धरल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडिओ-

गतवर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलवर मुंबईनं नाव कोरलं होतं. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघामध्ये मुंबई अव्वल स्थानावर आहे. मुंबईनं सर्वाधिक वेळा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. 

 हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव

9 एप्रिलपासून स्पर्धेचा शुभारंभ
14 व्या आयपीएलच्या हंगामात चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात रंगत होणार आहे. वानखेडेच्या मैदानात चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 10 एप्रिल रोजी वानखेडेच्या मैदानात नियोजित आहे. महाराष्ट्र राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी मुंबईतील सामन्याला राज्य सरकारने परवानगी दिलीये.  


​ ​

संबंधित बातम्या