IPL 2021: एबी 'बायो-बबल'मध्ये तर कोहली क्वारंटाईन

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 1 April 2021

सलामीच्या सामन्यात 9 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्ससमोर पाचवेळच्या चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. एबी डिव्हिलियर्स चेन्नईत दाखल झाल्यानंतर त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीही आरसीबी (RCB) च्या ताफ्यात जॉईन होण्यासाठी चेन्नईमध्ये पोहचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.  
सलामीच्या सामन्यात 9 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्ससमोर पाचवेळच्या चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. डिव्हिलियर्स 2011 पासून आरसीबीचा सदस्य आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिव्हिलियर्स सहाव्या क्रमांकावर असून त्याने तब्बल 23 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकविला आहे.  

'ही दोस्ती तुटायची नाय'; रैनाने खास कॅप्शनसह शेअर केला धोनीसोबतचा फोटो

एबी चेन्नईत दाखल झाल्याची माहिती देताना ‘‘महामानव RCB च्या बायोबबलमध्ये दाखल झालाय, असा उल्लेख आरसीबीने आपल्या ट्विटमध्ये केला होता.  डिव्हिलियर्स ने 2018 में आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये तो आरसीबीकडून खेळताना पाहायला मिळाले.  डिव्हिलियर्सने 169 आयपीएल सामन्यात जवळपास 40 ची सरासरी  आणि 151 च्या स्ट्राइक रेटने 4849 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतकासह 38 अर्धशतके झळकावली आहेत. 

IPL 2021 : CSK मध्ये एन्ट्री करताच पुजाराने केली षटकारांची बरसात (VIDEO)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचेचे नेतृत्व करणारा विराट कोहलीही चेन्नईमध्ये पोहचला असून त्याला 7 दिवस क्वारंटाईनच्या नियमावलीचे पालन करुनच बायोबबलमध्ये जॉईन व्हावे लागणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर विराट कोहलीने बायोबबलमधून ब्रेक  घेतला होता. त्यामुळे पुन्हा संघ सहकाऱ्यांच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वी त्याला क्वारंटाईननंतर त्याची कोरोना चाचणी होईल. त्यानंतर तो बायोबबलचा भाग होईल. 


​ ​

संबंधित बातम्या