विराटला मोठा दिलासा; कोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार खेळाडूनं सरावाला केली सुरुवात

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 April 2021

यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाबाधित झालेला पहिला खेळाडू असलेला बंगळूर संघाचा कोरोनामुक्त

IPL 2021 :  चेन्नई - यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाबाधित झालेला पहिला खेळाडू असलेला बंगळूर संघाचा देवदत्त पदिक्कल कोरोनामुक्त झाला असून तो बंगळूर संघाच्या सराव शिबिरातही दाखल झाला. आयपीएलच्या सलामीला गतविजेते मुंबई वि. बंगळूर सामना होत आहे त्यात पदिक्कल खेळण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यांपूर्वी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. बीसीसीआय आणि आयपीएलच्या नियमावलीनुसार मी घरीच विलगीकरणात होतो. आत दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर मी खेळण्यास मुक्त झालो आहे, असे पदिक्कलने सांगितले.

अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत पदिक्कलने चमकदार कमगिरी केली होती. १५ सामन्यांत मिळून त्याने ४७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर दीड महिन्यांपूर्वी मायदेशात झालेल्या विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्याने सात सामन्यांत मिळून ७३७ धावा फटकावल्या होत्या.

डॅनियल सॅम्स कोरोनाबाधित
एकीकडे पदिक्कल कोरोनामुक्त होत असताना बंगळूर संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सला कोरोना बाधित झाला आहे. ३ एप्रिल रोजी चेन्नईत आल्यावर घेण्यात आलेली त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती, परंतु आज घेण्यात आलेल्या चाचणीत तो बाधित झाल्याचे निदान झाले. भारतात आल्यापासून तो विलगीकरणात आहे त्यामुळे त्याचा कोणत्याही खेळाडूंशी संबंध आलेला नाही.
 


​ ​

संबंधित बातम्या