IPL 2021: भज्जीला फक्त एकच षटक का दिलं? मोर्गननं सांगितलं कारण 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 April 2021

IPL 2021:कोलकाता संघाकडून भज्जीनं पहिलं षटक टाकलं. या षटकात भज्जीनं फक्त ८ धावा दिल्या.

IPL 2021: सनराजर्स हैदराबादचा पराभव करत कोलकातानं इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १४ व्या हंगामाची सुरुवात विजयानं केली. आपल्या पहिल्या सामन्यात कोलकातानं सनराइजर्स हैदराबादला १० धावांनी पराभूत केलं. १८८ धावांच्या लक्षाचा बचाव करताना या सामन्यात कोलकाता संघाकडून भज्जीनं पहिलं षटक टाकलं. या षटकात भज्जीनं फक्त ८ धावा दिल्या. त्याच्या षटकात एक झेलही सुटला. पण त्यानंतर भज्जीला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. भज्जीला पुन्हा गोलंदाजीस का आंमत्रित केलं नाही? यावर कोलकाता संघाचा कर्णधार इयान मॉर्गन यानं स्पष्टीकरण दिलं आहे. 

सामन्यानंतर पंत काय म्हणाला?

मोर्गन म्हणाला की, 'भज्जीने पहिल्या षटकात चांगली सुरुवात केली होती. पण नंतरच्या षटकात त्याला गोंलदाजी दिली नाही. पण त्याच्या अनुभवाचा उपयोग इतर गोलंदाजांना सल्ला देण्यासाठी आम्ही केला.' चेन्नई सुपरकिंग्सने भज्जीला यंदा रिलीज केलं होतं. त्यानंतर कोलकाता संघानं त्याला बेस प्राइजवर आपल्या संघात घेतलं. यंदाच्या हंगामातील भज्जीचा हा पहिलाच सामना होता. यामध्ये त्याला फक्त एक षटक फेकण्यास मिळालं. यामध्ये त्यानं फक्त आठ धावा खर्च केल्या.  

पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी

केकेआरने भज्जीला फक्त एकच षटक टाकू दिलं. मॉर्गन यानं एकूण सहा गोलंदाजांचा वापर केला. आंद्रे रसेलने तीन तर प्रसिद्ध कृष्णा, शाकिब अल हसन, पॅट कमिंस आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी चार-चार षटकं टाकली. हैदराबाद संघानं प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता संघानं प्रथम फलंदाजी करताना १८७ धावांपर्यंत मजल मारली. १८८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १७६ धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना कोलकातानं १० धावांनी जिंकला. 


​ ​

संबंधित बातम्या