IPL 2021: कोहली संतापला; डग आउटमध्ये खुर्चीवर काढला राग (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 14 April 2021

सनरायझर्स हैदराबादने  टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने देवदत्त पदिक्कलच्या साथीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावाला सुरुवात केली.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामात विजयी सलामी देणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा कर्णधार विराट कोहली मैदानात स्थिरावला. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही त्याला मोठी खेळी करता आली नाही. सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात कोहली 33 धावा करुन बाद झाला.

कोहली जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर विजय शंकरच्या हाती झेल देऊन माघारी फिरला. 33 धावा करण्यासाठी कोहलीने 29 चेंडू खेळले. यात त्याने 4 चौकार लगावले. विजय शंकरने त्याचा एक सुरेख झेल टिपला. बाद झाल्यानंतर विराट स्वत:वरच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. मैदानातून बाहेर जाताना कोहलीने बाउंड्री लाईनवर रागाने बॅट आदळली. एवढेच नाही तर डग आउटमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर त्याने जोरात बॅट आदळून राग व्यक्त केला.  

IPL: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाजाला कोरोना

सनरायझर्स हैदराबादने  टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने देवदत्त पदिक्कलच्या साथीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावाला सुरुवात केली. पदिक्कल 11 धावा करुन तंबूत परतला.  भुवनेश्वर कुमारने त्याची विकेट घेतली. त्यानंतर शाहबाज अहमदही 14 धावा करुन परतला. ही दोघे परतल्यानंतर मॅक्सवेल-कोहली जोडीने 44 धावांची भागीदारी केली. कोहली 33 धावा करुन बाद झाल्यानंतर मॅक्सवेलच्या अर्धशतकामुळे बंगळुरुने 149 धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 3 षटकार आणि 5 चौकार खेचले.  


​ ​

संबंधित बातम्या