IPL 2021 : सनरायझर्सला आव्हान  शेवटचा टप्पा गाठायचे

सुनंदन लेले
Tuesday, 6 April 2021

एकच अष्टपैलू खेळाडू ही सनरायझर्स संघाची कमकुवत बाजू आहे. संघाकडे लक्ष दिले तर वॉर्नर, बेअरस्टो, केन विल्यमसन, केदार जाधव, जेसन रॉय सगळे शुद्ध फलंदाज आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, रशीद खान शुद्ध गोलंदाज आहेत.

सनरायझर्स संघाने आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम भूतकाळात केला आहे. २०२१ सालातील आयपीएलकरता निवडल्या गेलेल्या त्यांच्या संघाकडे नजर टाकली तर कोणतीच उणीव दिसत नाही. डेव्हिड वॉर्नरला संघाला शेवटच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचे आव्हान खुणावत आहे. सनरायझर्स संघाचा घेतलेला आढावा.

बलस्थाने : गोलंदाजीतील विविधता सनरायझर्स संघाचे खूप मोठे बलस्थान आहे. टी-२० क्रिकेटचा जागतिक सुपरस्टार रशीद खान संघाचा आधारस्तंभ आहे. चाणाक्ष भुवनेश्वर कुमारला संदीप शर्मा आणि गेल्या वर्षांत नावारूपाला आलेल्या नटराजनची साथ आहे आणि अर्थातच जेसन होल्डरचे अष्टपैलू रूप ताकद अजून वाढवत आहे. गोलंदाजांचे कौतुक केले म्हणून फलंदाजी कमजोर आहे असे अजिबात नाहीय. 

IPL 2021 : गुणवत्तेला न्याय देणार का?

कमजोरी : एकच अष्टपैलू खेळाडू ही सनरायझर्स संघाची कमकुवत बाजू आहे. संघाकडे लक्ष दिले तर वॉर्नर, बेअरस्टो, केन विल्यमसन, केदार जाधव, जेसन रॉय सगळे शुद्ध फलंदाज आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, रशीद खान शुद्ध गोलंदाज आहेत. एकमेव खरा अष्टपैलू खेळाडू जेसन रॉय आहे. इथेच थोडी कमजोरी सनरायझर्स संघाची दिसून येते. टी २० क्रिकेट प्रकारात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले संघ चांगली मजल गाठतात असे दिसून आले आहे.

संधी : वर सांगितल्याप्रमाणे सनरायझर्स संघ समतोल वाटतो, ताकदवान वाटतो. कप्तान वॉर्नरला ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करायला मिळणे शक्य नसल्याने अंगात असलेले सुप्त गुण दाखवून देण्याची आयपीएल सुवर्णसंधी आहे. केदार जाधवला मोठी संधी आहे आपले कसब दाखवायची आणि भारतीय संघात जाण्याचा प्रयत्न करण्याची. नटराजनला गेल्या आयपीएल मोसमाने भारतीय संघाचे सगळे दरवाजे उघडले. आता त्याची गोलंदाजीची शैली सगळ्यांना समजली असताना समोरच्या संघाच्या योजनांना नवीन युक्त्या लढवून सुरुंग लावण्याची संधी नटराजनला आहे.

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

धोका : डेव्हिड वॉर्नरची बॅट दांडपट्ट्यासारखी चालली तर सनरायझर्स संघ मोठी धावसंख्या सहज गाठतो असे दिसून आले आहे. नेमका धोका इथेच आहे. वॉर्नरला बाद करण्यात यश आले तर विल्यमसन किंवा केदार जाधववर थोडे दडपण येते, कारण हे दोनही फलंदाज जम बसवायला थोडा जास्त वेळ घेतात आणि मगच मोठे फटके मारू लागतात. वॉर्नर-बेअरस्टो जोडीला रोखण्याचा विचार समोरच्या संघातील गोलंदाज आजकाल करत नाहीत, तर थेट बाद कसे करता येईल याचा विचार करतात. ही दुधारी तलवार वाटत नाही का तुम्हाला. म्हणून सलामी चांगली झाली नाही तर पुढे काय, हा धोका सनरायझर्सला नक्कीच आहे.


​ ​

संबंधित बातम्या