रोहित शर्मावर ट्विट करणं Swiggy ला पडलं महागात; पोस्ट केली Delete

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

IPL 2021 : सोशल मीडियावर सध्या BoycottSwiggy असं ट्रेंड करत आहे.

IPL 2021 : आयपीएलच्या १४ व्या हंगामाला ९ एप्रिल रोजी सुरुवात झाली. प्रत्येक संघाचे एक-एक सामने झाले आहेत. मुंबई आणि कोलकाता संघाचे प्रत्येकी दोन सामने झालेत. गुणतालिका पाहिल्यास दिल्लीचा संघ अव्वल स्थानावर असल्याचं दिसतेय. रोहित शर्माच्या नेतॉत्वाखालील मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईनं कोलकात्याचा दहा धावांनी पराभव करत विजयाची गुढी उभारली. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय होय. कोलकाता आणि मुंबईच्या सामन्याआधी सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि स्विगी या दोघांचीच चर्चा होती. 

ऑनलाइन फूड डिलीव्हरी अॅप Swiggy वर नेटकऱ्यांनी टीका करत अनफॉलो करायचा धडाका सुरु केला. स्विगीनं मंगळवारी भारताचा उपकर्णधार रोहित शर्मावरुन सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाचा समाचार घेतला.

सामन्यापूर्वी एका युजर्सनं रोहित शर्माचा एडिटेड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या एडिटेड फोटोमध्ये रोहित शर्मा वडापाव खाताना दिसत आहे. या फोटोला रिट्विट करत स्विगीनं कमेंट केली. स्विगीची कमेंट चाहत्यांना पटली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर BoycottSwiggy असं ट्रेंड करत आहे.  

द्वेष करणारे हा फोटोशॉप आहे असं म्हणतील, अशी कमेंट स्विगीनं चाहत्याच्या फोटोशॉप पोस्टवर केली होती. स्विगी चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ इच्छित होतं. मात्र, सर्व काही उलटेच झालं. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर स्विगीलाच ट्रोल केलं. या प्रकारानंतर स्विगीनं आपली कमेंट डिलीट केली. पण अनेक नाराज चाहत्यांनी स्क्रीनशॉट पोस्ट करत स्विगीला ट्रोल केलं. 


​ ​

संबंधित बातम्या